2024 मध्ये 7 बॉलिवूड सिनेमे फ्लॉप, एका चित्रपटाने केली फक्त 5 कोटींची कमाई

2024 मध्ये बॉलिवूडच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि OTT प्लॅटफॉर्मवर निराशाजनक प्रदर्शन केले. या चित्रपटांनी त्यांच्या बजेटच्या तुलनेत खूपच कमी कमाई केली.  खाली दिलेल्या 7 चित्रपटांचा समावेश आहे जे 2024 मध्ये फ्लॉप ठरले  

Nov 28, 2024, 17:55 PM IST
1/7

1. 'क्रॅक'

विद्युत जामवालचा हा चित्रपट बनवण्यासाठी 45 कोटी रुपये खर्च झाले, पण त्याने फक्त 13 कोटींची कमाई केली.

2/7

2. 'जिगरा'

आलिया भट्टने जरी या चित्रपटाचे मोठे प्रमोशन केले असले तरी, या चित्रपटाने 90 कोटी रुपयांच्या बजेटच्या तुलनेत फक्त 35 कोटींची कमाई केली.

3/7

3. 'योद्धा'

सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा हा चित्रपट 55 कोटी रुपयांच्या बजेटवर तयार झाला, पण त्याने फक्त 35 कोटींची कमाई केली. 

4/7

4. 'मे अटल हू'

पंकज त्रिपाठीचा 'मे अटल हू' हा चित्रपट 20 कोटी रुपये बजेट असताना केवळ 8 कोटी रुपये कमावू शकला.  

5/7

5. 'रुस्लान'

'रुस्लान' या चित्रपटासाठी 25 कोटी रुपये खर्च झाले होते, पण तो केवळ 5 कोटी रुपयेच कमावू शकला.

6/7

6. 'बडे मिया छोटे मिया'

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' चित्रपट 350 कोटी रुपयांच्या बजेटवर तयार झाला, पण बॉक्स ऑफिसवर त्याने फक्त 60 कोटी रुपयांची कमाई केली.

7/7

7. 'मैदान'

अजय देवगनचा 'मैदान' हा चित्रपट 250 कोटी रुपयांच्या बजेटवर तयार झाला, पण तो फक्त 52 कोटी रुपयेच कमावू शकला. हे सर्व चित्रपट त्यांच्या अपेक्षित कमाईच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर फ्लॉप ठरले.