...म्हणून नाना पाटेकरांनी 19 वर्षं अनिल कपूरसह काम केलं नाही; त्याच्या तोंडावर म्हणाले 'तुझ्याइतका बकवास माणूस...'

बॉलिवूडमध्ये पडद्यावर अभिनेत्यांच्या ज्या जोड्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा उल्लेख केला जातो. 'वेलकम' चित्रपटातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं.   

Shivraj Yadav | Feb 21, 2025, 20:49 PM IST

बॉलिवूडमध्ये पडद्यावर अभिनेत्यांच्या ज्या जोड्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा उल्लेख केला जातो. 'वेलकम' चित्रपटातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. 

1/9

2/9

परिंदा चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. पण यानंतर नाना पाटेकर यांनी तब्बल 19 वर्षं अनिल कपूरसोबत काम केलं नाही. यामागील कारणाचा खुलासाही त्यांनी केला आहे.   

3/9

परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा नाना पाटेकर यांचा आरोप आहे. एका मुलाखतीत त्यांनी अनिल कपूरच्या तोंडावर हे बोलून दाखवलं.  

4/9

मुलाखतीदरम्यान 1989 मधील परिंदा चित्रपटाचा विषय निघाला. नाना म्हणाले की, "तू मला परिंदाच्या वेळी फार त्रास दिला होता. मी खरं तर तुझ्या भावाची भूमिका निभावणार होतो. आपण रिहर्सलही केली होती. पण नंतर तुझ्यामुळे ती भूमिका जॅकीला देण्यात आली".  

5/9

पुढे नाना म्हणाले की, "पण मला त्याचे आभार मानायचे आहेत, कारण जर त्याने जॅकीसाठी आग्रह केला नसता तर मला अन्नाची भूमिका मिळाली नसती".   

6/9

यावेळी अनिल कपूरने आपली बाजू मांडत सांगितलं की, "तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी हम पाँचचा कास्टिंग डायरेक्टर होतो. मी अशी अनेक कामं केली आहेत. मी कास्टिंगमध्येही होती. मी अभिनेत्यांना सेटवर घेऊन जायचो. मिथूनला घरुन सेटवर घेऊन जायचो. मी ही सर्व काम केली आहेत. हम पाँचच्या कास्टिंगमध्ये माझी फार मोठी भूमिका होती. मी कदाचित चुकीचा असेन, पण मला परिंदामध्ये भावाच्या भूमिकेसाठी जॅकी जास्त योग्य असेल असं वाटलं. मी फार प्रामाणिकपणे सांगत आहे".  

7/9

नाना त्यावर म्हणाले की, "प्रामाणिकपणे मी भूमिका निभावली. तुझ्या लक्षात आलं नसेल मात्र मी त्यानंतर 19 वर्षं तुझ्यासोबत काम केलं नाही. मी म्हटलं, हा तर फार बकवास माणूस आहे".   

8/9

त्यावर अनिलने सांगितलं की, "मी तुमच्याविरोधात नव्हतो, मी फक्त दिग्दर्शकाला सुचवलं होतं. अंतिम निर्णय त्यांचाच होता. हे लोक नेहमी हिरोच्या खांद्यावरुन बंदूक चालवतात हे लक्षात ठेवा".  

9/9

त्यावर नाना यांनी त्यावेळी तू स्टार होतास, तुझं ऐकावंच लागलं असतं असं म्हटलं. नंतर त्यांनी जॅकीने फार चांगलं काम केलं. त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला अशी आठवण सांगितली.