'बाहुबली'ची देवसेना झाली हसण्याच्या आजाराची शिकार, जाणून घ्या या विचित्र आजाराची लक्षणं

Anushka Shetty laughing disease : ‘बाहुबली’फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी म्हणजेच 'बाहुबली'ची देवसेना हिला लाफिंग डिजीज नावाच्या आजाराने ग्रासलं आहे. हा आजार नेमका काय असतो? हसण्याचा कोणाला आजार असतोय का? असा सवाल तुम्हाला देखील पडला असेल. जाणून घ्या सर्वकाही

Saurabh Talekar | Aug 28, 2024, 20:13 PM IST
1/5

दुर्मिळ अवस्था

हसण्याच्या या आजाराला स्यूडोबुलबार इफेक्ट म्हणून ओळखलं जातं. ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल अवस्था आहे, ज्यामध्ये माणून अचानक हसतो किंवा रडतो.

2/5

स्यूडोबुलबार इफेक्ट

स्यूडोबुलबार इफेक्टचा मेंदूवर थेट परिणाम होत असतो. जवळपास 15 मिनिटं ते हसणं किंवा रडणं यामध्ये घडताना दिसतं. भावनिक गोष्टींची प्रखरता यामध्ये अधिक असते.

3/5

अनियंत्रित हसणं

हा आजार असलेली व्यक्ती उगाचच हसतो, नकळत अनियंत्रित हसणं किंवा रडणं कदाचित मजेशीर वाटेल पण हा आजार गंभीर ठरू शकतो.

4/5

न्यूरोसायकियाट्रिक आजार

हसण्याचा आजार हा मानसिक आजाराचा देखील भाग आहे. पण हा पूर्णपणे मानसिक आजार म्हणता येत नाही. मेंदू नीट कार्य करीत नसल्यामुळे हा न्यूरोसायकियाट्रिक आजार मानला जातो.

5/5

उपचार

अशी लक्षणं दिसू लागल्यास दीर्घ, आरामदायी आणि हळूवार श्वास घ्यावा. तसेच वेगळा विचार करून खांद्यांना आणि छातीला आराम द्यावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार देखील करावेत.