Barsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, आंदोलन पेटणार

Barsu Refinery Project : बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. 

| Apr 28, 2023, 14:50 PM IST

Barsu Refinery Project Against Protest : बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याठिकाणी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे. आंदोलकांची धरपकड करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता दिसत आहे.

1/9

बारसूमध्ये पोलीस आणि आंदोलक आमने सामने.... महिला अधिक आक्रमक  बारसू येथील महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही येथून हलणार नाही. आम्हाला प्रकल्प नकोय. कोणीही प्रकल्पाची जबरदस्ती करु नये, असे सांगत महिला आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आमचा जीव गेला तरी आम्ही हलणार नाही, असा निर्धार आंदोलन करणाऱ्या महिलांनी केला आहे. पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला आहे. आंदोलनकांची धरपकड करण्यात येत आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

2/9

बारसूमध्ये पोलीस आणि आंदोलक आमने सामने.... जोरदार राडा

3/9

बारसूमध्ये पोलीस आणि आंदोलक आमने सामने.... जोरदार राडा

4/9

Barsu Refinery Project Against Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला आंदोलक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.  खासदार विनायक राऊत आंदोलकांची भेट घेण्यासाठी ते बारसूच्या सड्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला. तसेच रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

5/9

खासदार विनायक राऊत आंदोलकांची भेट घेण्यासाठी ते बारसूच्या सड्यावर गेले होते. तिथं त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आजही रिफायनरी विरोधात आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चासाठी मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लोक जमले आहेत. त्यामुळे या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

6/9

बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. स्थानिकांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी रोखले आणि पुढे जाऊ देण्यास नकार दिला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त होता.

7/9

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला आंदोलक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी निघालेले खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी अडवले आणि त्यांना माघारी जा असे सांगितले.

8/9

रिफायनरी विरोधकांचा आज मोर्चा निघण्याची तयारी सुरु होती. यावळी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना रोखले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. 

9/9

राजापूर येथील बारसू रिफायनरी विरोधकांचा आज मोर्चा निघण्याची तयारी सुरु होती. त्याचवेळी खासदार राऊत यांना ताब्यात घेतले. बारसूच्या माळरानावर आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. त्याआधीच राऊत यांना ताब्यात घेतले.