'छावा'साठी 'या' मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याला होती पसंती, नकार दिल्याने झाली विकी कौशलची निवड

'छावा'मधील विकी कौशलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, 'छावा'साठी विकी कौशल आधी या अभिनेत्याला मिळाली होती ऑफर. 

Soneshwar Patil | Feb 22, 2025, 16:28 PM IST
1/7

विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या 'छावा' चित्रपटाने धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या 7 दिवसांमध्ये चित्रपटाच्या बजेटच्या डबल कमाई केली आहे.

2/7

'छावा' चित्रपटाने कमी दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कमाई करून इतिहास रचला आहे. हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत पहिल्या नंबर आहे. 

3/7

या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. सध्या त्याच्या या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे. चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. 

4/7

पण तुम्हाला माहिती आहे का की, 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल नाही तर मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याला पहिली पसंती होती. कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊयात सविस्तर. 

5/7

 साउथच्या प्रादेशिक पोर्टल TeluguChitraalu वर ट्विट करण्यात आले होते. ज्यामध्ये दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चित्रपटासाठी सर्वात प्रथम महेश बाबू याच्यासोबत संपर्क साधला होता. 

6/7

मात्र, अभिनेत्याने नकार देताच दिग्दर्शकांनी विकी कौशल याच्याशी संपर्क साधला. चित्रपटाची कथा ऐकून विकी कौशलने चित्रपटासाठी होकार दिला. 

7/7

लक्ष्मण उतेकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'छावा'साठी विकी कौशल हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे होता असं त्यांनी सांगितले.