आठवड्याचे ३ दिवस काम, राजांसारखे श्रीमंत, सरकारच्या फुकटच्या पैशाला विरोध करणारे; 'या' देशातील जनता आहे फारच विचित्र

Swiss People: सरकारने फुकटच्या पैशाची घोषणा केली तरी निवडणुकीचे निकाल बदलतात, पण एका देशात फुकटच्या पैशाच्या विरोधात उतरणारे लोक आहेत.

तेजश्री गायकवाड | Feb 22, 2025, 15:52 PM IST

Swiss People: सरकारने फुकटच्या पैशाची घोषणा केली तरी निवडणुकीचे निकाल बदलतात, पण एका देशात फुकटच्या पैशाच्या विरोधात उतरणारे लोक आहेत.

1/7

जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमधील लोक इतके विलासी आणि आरामशीर जीवन जगतात की त्याबद्दल ऐकूनच त्याचा हेवा वाटतो. इथले लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्यावर  विश्वास ठेवतात. त्यांची जीवनशैली जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.  

2/7

स्वित्झर्लंडच्या लोकांना स्विस लोक म्हणतात. हे लोक खूप कमी काम करतात, तरीही भरपूर कमावतात. स्वित्झर्लंडचे लोक आठवड्यातून फक्त 3 दिवस काम करतात आणि छान जीवन जगतात.

3/7

स्वित्झर्लंड लोक इतके निवांत आणि थंड आहेत की त्यांना पैशाचीही पर्वा नाही. इथल्या लोकांबद्दल असं म्हटलं जातं की ते इतके आळशी आहेत की ते जमिनीवर पडलेले पैसेही उचलत नाहीत.  

4/7

एकत्र बसणे, खाणे, प्रवास करणे, त्यांच्या छंदांचा आस्वाद घेण्यात येथील लोक आघाडीवर आहेत. येथील वृद्ध लोकही जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात.  

5/7

स्वित्झर्लंडमध्ये बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत आहे. आरोग्य सेवा देखील कव्हर केली जाते, त्यामुळे लोकांना ना शिक्षणावरील खर्चाची चिंता करावी लागते आणि आजारपणात येणाऱ्या रुग्णालयाच्या बिलांची.  

6/7

इथले लोक भविष्यासाठीही बचत करत नाहीत, तर वर्तमानाचा आनंद घेतात. स्विस बँका जगभर प्रसिद्ध आहेत, पण त्यातील बहुतांश पैसा हा परदेशी लोकांचा आहे, स्वित्झर्लंडमधील लोक पैसे वाचवून बँकेत ठेवण्यावर विश्वास ठेवत नाहीत.  

7/7

काही वर्षांपूर्वीपर्यंत इथे काम न करताही स्विस लोकांना दर महिन्याला सरकारकडून चांगली रक्कम मिळायची. मात्र सरकारी मदत घ्यायची नाही, असे म्हणत लोकांनी याला विरोध केला.