'हे' सहा प्राणी आहेत एवढे महाकाय की पाहून धक्काच बसेल

या निसर्गात मोजता येणार नाही एवढ्या प्रकारचे जीवजंतू राहतात. त्यापैकी कित्येक खूप लहान तर कित्येक खूप मोठ्ठे आहेत.

Feb 22, 2025, 14:43 PM IST
1/7

'हे' सहा प्राणी आहेत एवढे महाकाय की पाहून धक्काच बसेल

 तुम्हाला जागातील 6 विशालकाय प्राण्याविषयी माहित आहे का?  

2/7

ब्लू व्हेल (Blue Whale)

ब्लू व्हेल (देवमासा) हा जगातील सर्वात मोठ्ठा जीव आहे. ब्लू व्हेल ही 30 मीटर लांबीची तर 1 लाख 90 हजार किलो एवढी वजनदार असते. या माश्याच्या हृदयाचा आकार एखाद्या कार एवढा मोठा असतो तर त्याच्या ठोक्यांचा आवाज 3 किलोमीटर लांब अंतरापर्यंत येतो.  

3/7

साल्टवॉटर क्रोकोडाइल (Saltwater Crocodile)

 साल्टवॉटर क्रोकोडाइल जगातील दुसरा मोठ्ठा जीव आहे. हा प्राणी मगरीच्या जातीचा असून याची लांबी 7 मीटर इतकी असते. या मगरीचे वजन तब्बल 1000 किलो असते. या मगरीला तिच्या तरबेजपणे शिकार करण्यासाठी ओळखले जाते.  

4/7

शहामृग (Ostrich)

जगातील तिसरा विशाल पक्षी शहामृग आहे. शहामृग 9 फीट उंच आणि 156 किलो वजनाचा असतो. हा पक्षी त्याच्या वजनदार शरीरामुळे उडू शकत नाही. पण, याच्या पळण्याचा वेग ताशी 70 किलोमीटर एवढा आहे.  

5/7

शार्क (Shark)

शार्क हा जगातील चौथ्या क्रमांकाचा महाकाय जीव आहे. शार्क माश्याची लांबी एकूण 14 ते 21 मीटर इतकी असून यांना खूप मोठ्ठे आयुष्य असते. पाण्यातील लहान मासे खाऊन जाणारे शार्क मासे 250 ते 500 वर्षे जगू शकतात.  

6/7

ग्रीन एनाकोंडा (Green Anaconda)

ग्रीन एनाकोंडा हा देखील एक महाकाय जीव आहे. याची लांबी 9 मीटर इतकी असून वजन एकूण 250 किलो इतके असते. या सापाच्या दातांमध्ये जास्त विष नसते पण तो शिकाराला घट्ट दाबतो आणि मारून खातो. 

7/7

कॉमोडो ड्रेगन (Komodo Dragon)

कॉमोडो ड्रेगन हा देखील एक विशाल प्राणी आहे. हा सरपटणाऱ्या प्राण्यांमधील सर्वात मोठा जीव आहे. या ड्रेगनची लांबी 3.1 मीटर इतकी असते. तसेच वजन 150 किलो असते. या प्राण्याच्या लाळीमध्ये घाण आणि विषारी बॅक्टेरिया असतात.