31 वर्षीय Mostlysen अडकणार लग्नबंधनात! 13 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर BF सोबत कर्जतमध्ये करणार लग्न; तारीखही ठरली

लोकप्रिय युट्यूबर प्राजक्ता कोळी ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. प्राजक्ता ही जवळपास 13 वर्षांपासून वृषांक खनालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता लवकरच ते लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Diksha Patil | Feb 22, 2025, 13:54 PM IST
1/7

रिपोर्ट्सनुसार, प्राजक्ता आणि वृषांक 25 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 

2/7

टाइम्स नावच्या रिपोर्ट्सनुसार, प्राजक्ता आणि वृषांकच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. जवळपास एक दशकसोबत राहिल्यानंतर त्यांनी आता त्यांच्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

3/7

प्राजक्ता आणि वृषांक यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित असणार आहेत. कर्जतमध्ये ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

4/7

प्राजक्ता आणि वृषांक या दोघांनी त्यांच्या लग्नाविषयी कोणाला सांगितलं नाही, पण वृषांकनं शेअर केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांना त्यांच्या लग्नाविषयी थोडी कल्पना आली आहे. 

5/7

वृषांकनं शेअर केलेल्या फोटोत प्राजक्ताचं आणि त्याचं कुटुंब दिसलं. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की 'या कुटुंबासाठी आणि या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांसाठी आभारी आहे. #NewBeginnings'

6/7

वृषांकनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानं ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत अशा कमेंट येऊ लागल्या. हे पाहता त्यानं त्याचं कमेंट सेक्शन लिमिटेड केलं आहे.

7/7

जेव्हा प्राजक्ता ही 18 वर्षांची होती आणि वृषांक हा 22 वर्षांचा होता. तेव्हा पासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत.