Mumbai Indians कडून खेळणार बॉलिवूड स्टारचा मुलगा! 4 शतकं ठोकून मिळवली जागा

Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता जवळपास फक्त 1 महिना शिल्लक आहे. 22 मार्च पासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरुवात होणार असून यात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रेंचायझी असून ते जगभरातील इतर लीगमध्ये सुद्धा सहभागी होत असतात. आता बॉलिवूड अभिनेत्याचा मुलगा देखील मुंबई इंडियन्स सोबत खेळताना दिसणार आहे. 

Pooja Pawar | Feb 22, 2025, 13:21 PM IST
1/7

क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारा बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा आता मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीचा भाग झाला आहे.  3 इडियट्स आणि 12th फेल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक विधु विनोद चोपड़ा यांचा मुलगा अग्नि चोपड़ा याला मुंबई इंडियंस न्यूयॉर्कने मेजर लीग क्रिकेटसाठी आपल्या संघात सामील केलं आहे. 

2/7

अग्नि चोपडा याने रणजी ट्रॉफीच्या मागच्या सीजनमध्ये जवळपास 4 शतक ठोकली होती. 26 वर्षांचा अग्नी चोपडा हा उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये मागच्या वर्षी पदार्पण केले होते. मिजोरमकडून खेळणारा अग्नि चोपड़ाने यात शतकं सुद्धा केली होती. 

3/7

अग्नि चोपड़ा यानंतर जगातील एकमेव फलंदाज ठरला ज्याने पहिल्या चार फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये शतक केली. अग्निने आतापर्यंत 11 रणजी ट्रॉफी सामने खेळले असून यात त्यांचा ऍव्हरेज 94.94  राहिला असून त्याने 1804 धावा केल्या आहेत. तसेच यात 9 शतकांचा सुद्धा समावेश आहे. 

4/7

CNBC TV 18 नुसार मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने अग्नि चोपड़ाला डोमेस्टिक प्लेयर्स ड्रॉफ्टमध्ये निवडलं आहे. त्याला 50 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 43 लाख रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. मेजर लीग क्रिकेट ही एक अमेरिकन टी 20 लीग असून त्याची सुरुवात 2023 मध्ये झाली. या स्पर्धेत जवळपास 6 संघांनी सहभाग घेतला होता.   

5/7

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क मेजर लीग क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असून या स्पर्धेचे पहिले विजेतेपद मुंबई इंडियन्सनेच जिंकले होते. वेस्टइंडीजचा कायरन पोलार्ड संघाचा कर्णधार होता. 

6/7

मिशिगनच्या डेट्रॉईटमध्ये जन्म झाल्यामुळे अग्नि चोप्राकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. क्रिकबजच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयच्या वतीने परदेशी पासपोर्ट धारकांना रणजी ट्रॉफी खेळू न देण्याच्या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अग्नि यांने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

7/7

मेजर लीग क्रिकेटमध्ये जसदीप सिंग हा सर्वात महागद खेळाडू ठरला. 32 वर्षांचा जसदीप सिंग या वेगवान गोलंदाजांवर  75,000 डॉलर्स म्हणजेच जवळपास 64 लाख रुपयांना साईन करण्यात आले.