भेसळयुक्त आणि शुद्ध गुळ कसा ओळखावा? जाणून घ्या, टीप्स

सध्या, खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. भेसळयुक्त पदार्थ शरीराला नुकसान पोहचवू शकतात. बाजारात भेसळयुक्त गुळ विकण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे, लोकांना शुद्ध गुळ आणि भेसळयुक्त गुळ कसा ओळखावा? असा प्रश्न पडत आहे. जाणून घ्या, या प्रश्नाचे उत्तर.

Feb 22, 2025, 11:53 AM IST

Jaggery: सध्या, खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. भेसळयुक्त पदार्थ शरीराला नुकसान पोहचवू शकतात. बाजारात भेसळयुक्त गुळ विकण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे, लोकांना शुद्ध गुळ आणि भेसळयुक्त गुळ कसा ओळखावा? असा प्रश्न पडत आहे. जाणून घ्या, या प्रश्नाचे उत्तर.

 

1/7

साखरेच्या तुलनेत गुळ अधिक आरोग्यदायी आणि फायदेशीर मानलं जातं. गुळात शरीरासाठी लाभदायक असणारी लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्त्वं आढळतात. म्हणून डायबिटीज असणाऱ्यांना साखरेऐवजी गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.   

2/7

गुळाचा गुणधर्म हा उष्ण असतो तसेच, आरोग्यासाठी गुळाचे अनेक फायदे आहेत. गुळामध्ये उष्णता असल्याकारणाने हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी त्याचे अधिक सेवन केले जाते.   

3/7

मात्र हल्ली बाजारात विकण्यासाठी भेसळयुक्त गुळाचे प्रमाण वाढत चालले आहे. भेसळ केलेला गुळ शरीराला नुकसान पोहचवू शकतो. गुळ विकत घेताना तो शुद्ध आहे की भेसळयुक्त? हे ओळखण्यासाठी काही टीप्स जाणून घ्या.  

4/7

बाजारात पिवळा आणि तपकिरी अशा दोन प्रकारचा गुळ उपलब्ध असतो. जर गुळाच्या ढेपेवर तुम्हाला गडद आणि पांढऱ्या रंगाचे डाग जास्त प्रमाणात दिसत असतील तर तो गुळ भेसळ केलेला असू शकतो.  

5/7

गुळाची चव ही खूपच गोड असते. जर तुम्हाला गुळाची चव थोडी फीकट म्हणजेच गोडवा कमी वाटत असेल तर कदाचित तुम्ही भेसळयुक्त गुळाचे सेवन करत आहात.  

6/7

नैसर्गिक गुळाची ढेप ही कडक आणि टणक असते. जर गुळाची ढेप ही अगदी कडक आणि ठोस नसेल तर तो भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. गुळाची ढेप मऊ जाणवत असल्यास ती विकत घेऊ नका.   

7/7

पिवळा किंवा केशरी गुळ हा प्रकिया केलेला तसेच काळा किंवा तपकिरी रंगाचा गुळ हा सेंद्रीय असल्याचं मानलं जातं. (Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)