ब्लॉकबस्टर संडे... भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? कुठे Free पाहता येणार?

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याने क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढत असून स्पर्धेतील पाचवा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक फ्रीमध्ये कुठे पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Feb 22, 2025, 11:18 AM IST
1/7

भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असतं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवार 23 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा हे संघ एकमेकांचा सामना करणार असून हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

2/7

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघांचा सहभाग असून यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. यापैकी भारत पाकिस्तान हे संघ ग्रुप ए मध्ये असून यात बांगलादेश आणि न्यूझीलंडचा देखील समावेश आहेत. प्रत्येक संघ ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येकी 3 सामने खेळेल. 

3/7

ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानने त्यांचा पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध 19 फेब्रुवारी रोजी खेळला. मात्र यात तब्बल 60 धावांनी यजमान पाकिस्तानचा पराभव झाला.  तर भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध पार पडला. यात भारताने 6 विकेट्सने बांगलादेशवर विजय मिळवला. 

4/7

23 फेब्रुवारी रोजी होणारा सामना हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. याच कारण म्हणजे जर या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान असलेला पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून थेट बाहेर होईल. तसेच जर भारताला पाकिस्तानचा पराभव करण्यात यश आलं तर भारत थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये स्थान मिळवेल. 

5/7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत पाकिस्तान यांच्या हेड टू हेड सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघ 5 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला तर दोनदा भारताला पाकिस्तानवर विजय मिळवण्यात यश आले.   

6/7

कुठे पाहाल सामना?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल.

7/7

मोबाईल यूजर्सना JioHotstar च्या अँपवर भारत पाकिस्तान हा सामना फ्रीमध्ये पाहता येईल. रविवारी दुपारी 2: 30 वाजता हा सामना पार पडणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल.