माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ...; निवृत्तीच्या अफवांवर Mary Kom चं स्पष्टीकरण

Mary Kom Retirement: भारताची महिला बॉक्सर (Indian Boxer) मेरी कोमने निवृत्तीची घोषणा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान यावेळी मेरीने निवृत्ती घेतली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

| Jan 25, 2024, 11:18 AM IST
1/7

6 वेळा विश्वविजेती असलेली भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोम हिने निवृत्ती घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र यानंतर गुरुवारी आपण निवृत्ती घेतली नसल्याचं तिने स्पष्ट केलंय.

2/7

मेरी कोमच्या म्हणण्यानुसार, मी निवृत्ती जाहीर केलेली नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. ज्यावेळी मला निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा मी स्वतः सर्वांसमोर येऊन निवृत्ती जाहीर करेन.

3/7

काही मिडीया रिपोर्ट्ने मी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. मात्र त्यामध्ये तथ्य नाहीये, असंही मेरी कोमने म्हटलंय.

4/7

मेरी कोमने 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावलं होतं. 

5/7

इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) च्या नियमांनुसार, पुरुष आणि महिला बॉक्सर्सना फक्त 40 वर्षे वयापर्यंत स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी आहे. मात्र आता मेरी कोमचं वय 41 झालं आहे.

6/7

मेरी कोम ही जगातील पहिली अशी महिला बॉक्सर आहे, जिने सहा वेळा विश्वविजेतं होण्याचा मान मिळवलाय.

7/7

2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी मेरी कोम ही भारतातील पहिली महिला आहे. तसंच 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक पटकावलं होतं.