समुद्रतळाशी आढळली बेली कॉम्ब जेली फिश; इंद्रधनुष्यही याच्या सौंदर्यासमोर पडेल फिके

समुद्राच्या तळाशी इतके जीव आहे की दररोज नवनवीन बाबी समोर येतायेत. संशोधकांना समुद्राचं गूढ अद्याप उकललेलं नाही. अशातच समुद्रात डायव्हिंग करणा-या एका टीमनं इंद्रधनुष्याप्रमाणे चमकणारा मासा कॅमे-यात कैद केलाय.

Mar 16, 2024, 18:25 PM IST

Belly Comb Jellyfish Rainbow Colours : निसर्गाची अनेक रहस्यं समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत. समुद्रात जितकं खोलवर जाल, तितक्या आत नवनवीन चमत्कारीक गोष्टी दिसू लागतात. सागराच्या पोटात असे अनेक जीव आहेत. ज्यांच्याबद्दल आपण फक्त कथांमधून ऐकलं असेल किंवा पुस्तकातूनच वाचलं असेल.  अनेकदा असे जीव समुद्रातही पाहायला मिळतात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे...मात्र आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे हे प्राणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. असाच एक आश्चर्यकारक प्राणी म्हणजे रक्तरंजित बेली कॉम्ब जेली.

 

 

1/7

अगदी हुबेहुब इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे असलेली ही माशांची जगातील सर्वात अनोखी प्रजाती आहे. 

2/7

खास वैशिष्ट्यांमुळे हा मासा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. 

3/7

आजही या दुर्मिळ प्रजातीबद्दल लोकांची उत्सुकता आणि गूढ कायम आहे.

4/7

सुमारे 20 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या प्राण्याचा शोध लावला होता. 

5/7

रक्तरंजित बेली फिश जेव्हा पाण्यात प्रवास करते तेव्हा तिच्या शरीरावर इंद्रधनुष्याचा तेजस्वी प्रकाश दिसून येतो. यामुळे या माशाच्या सौंदर्यात भर पडते.

6/7

अत्यंत दुर्मिळ असा हा मासा पाहिल्यानंतर संशोधकही बुचकळ्यात सापडले आहेत. 

7/7

ज्याचं संपूर्ण शरीर चमकदार आहे... हा मासा दिसायला एखाद्या जेली फिशसारखा आहे.