गणेशोत्सवात 'बेस्ट' ची मुंबईत रात्रभर सेवा; गर्दीमुळे धावणार अतिरिक्त बसगाड्या

Mumbai Ganeshotsav : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बेस्टने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना रात्रभर मुंबईतील गणपती बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे.

Sep 19, 2023, 08:38 AM IST

Mumbai Ganeshotsav : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बेस्टने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना रात्रभर मुंबईतील गणपती बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे.

1/7

रात्रभर बेस्टच्या मदतीने घेता येणार गणपतीचे दर्शन

Mumbai Best Bus Darshan Route for Ganeshotsav

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्रभर बेस्टसेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

2/7

किती बसगाड्या धावणार?

How many buses will run for Ganeshotsav

गणेशोत्सतव काळात मुंबईतील नऊ मार्गांवर बेस्ट प्रशासनाच्या 27 अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांची गैरसोई टळणार आहे.

3/7

किती दिवस सुरु असणार बस?

How many days will the bus be open for Ganeshotsav

सुरुवातीला बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर बस सेवा देण्याचे नियोजन केले होते. मात्र गणेशोत्सवासाठी होणारी गर्दी पाहता 19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

4/7

किती वाजेपर्यंत सुरु असणार?

What time will the bus start for Ganeshotsav

उत्तर पश्चिम मुंबईकडून गिरगाव, परळ, लालबाग, चेंबूरमार्गे या बसगाड्या धावणार आहेत. या बस रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत सेवेत असतील.

5/7

पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना

Instructions given by the Guardian Minister for Ganeshotsav

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक घेऊन गणेशोत्सवकाळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली होती.

6/7

गर्दीच्या ठिकाणी सोय

Best convenience for Ganeshotsav in crowded places

दादर, भायखळा, चिंचपोकळी या गणेशोत्सवाची पंढरी असलेल्या भागांत पाच ते सहा मार्गांवर या बसगाड्या धावणार आहेत.

7/7

कोणत्या बस धावणार?

Which buses will run for Ganeshotsav

4 लि. डॉ. एम. इक्बाल चौक-ओशिवरा आगार, 7 लि. विजयसिंह वल्लभ चौक (पायधुनी)-विक्रोळी आगार, 8 लि. डॉ. एम. इक्बाल चौक-शिवाजी नगर टर्मिनस, ए 21 डॉ. एस. पी. एम चौक-देवनार आगार, ए 42 पं. पळुस्कर चौक-सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक, 44 वरळी गाव-एस. वाय. चौक (काळाचौकी), 66 सीएसएमटी-राणी लक्ष्मीबाई चौक, 69 डॉ. एस. पी. एम. चौक-पी. टी. उद्यान (शिवडी), सी-40 पी. टी. उद्यान (शिवडी)-दिंडोशी बस स्थानक (सर्व फोटो - PTI)