अमित शहांच्या संकल्पनेतील भारतपोल इंटरपोलपेक्षा किती वेगळे?

भारतपोल हे इंटरपोलप्रमाणेच कार्य करते. पण यात काय फरक आहे? याबद्दल जाणून घेऊया.

| Jan 07, 2025, 17:55 PM IST

Bharatpol and Interpol:भारतपोल हे इंटरपोलप्रमाणेच कार्य करते. पण यात काय फरक आहे? याबद्दल जाणून घेऊया.

1/11

अमित शहांच्या संकल्पनेतील भारतपोल इंटरपोलपेक्षा किती वेगळे?

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

Bharatpol and Interpol: गुन्हे करुन देश सोडून पळून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. यामुळे गृहखात्यावर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पण आता नव्याने आलेल्या भारतपोलमुळे ही कारवाई सोपी जाणार आहे. भारतपोल हे इंटरपोलप्रमाणेच कार्य करते. पण यात काय फरक आहे? याबद्दल जाणून घेऊया.

2/11

लांबलचक कागदपत्रांची प्रक्रिया

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार अनेकदा राज्ये बदलतात आणि संधी मिळताच देश सोडून निघून जातात. अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना लांबलचक कागदपत्रांच्या प्रक्रियेतून जावे लागते. यासर्वात बराच काळ जातो.

3/11

प्रगत ऑनलाइन पोर्टल

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

परदेशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालय भारतपोल पोर्टल सुरू केले आहे. गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते या पोर्टलचे लोकार्पण केले जाणार आहे. सीबीआयने तयार केलेले हे अॅडव्हान्स ऑनलाइन पोर्टल आहे.

4/11

सीबीआयमार्फत माहिती

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

भारतपोर्टलच्या माध्यमातून कोणत्याही राज्यातील सुरक्षा यंत्रणा सीबीआयमार्फत परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांची माहिती घेऊ शकतात. इतकेच नाही तर सीबीआयच्या माध्यमातून सुरक्षा एजन्सीला इंटरपोलची मदतही या पोर्टलद्वारे लवकर मिळू शकते.

5/11

इंटरपोल म्हणजे काय?

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

    इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन. ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी आणि गुन्हेगारांविरुद्ध सर्व देशांच्या पोलिसांमध्ये समन्वय साधण्याचे काम करते. ही 195 देशांतील तपास यंत्रणांची संघटना आहे.ही संस्था 1923 पासून कार्यरत असून इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन शहरात आहे.

6/11

आंतरराष्ट्रीय नोटिसा

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

इंटरपोलच्या माध्यमातून एका देशातील गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण करून त्यांना अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नोटिसा बजावल्या जातात. भारताच्या बाजूने सीबीआयचा यात सहभाग आहे. 

7/11

दुसऱ्या देशात बसलेल्या गुन्हेगाराची माहिती

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

सोप्या भाषेत सांगायचे तर कोणत्याही राज्याच्या पोलिसांना किंवा अन्य एजन्सीला दुसऱ्या देशात बसलेल्या गुन्हेगाराची माहिती हवी असल्यास ते सीबीआयला विनंती करतात. त्यानंतर ही प्रक्रिया पुढे सरकते.

8/11

यलो आणि रेड नोटीस

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

भारतातील सीबीआय अधिकारी इंटरपोलमध्ये नियुक्त केले जातात. इंटरपोल अनेक प्रकारच्या नोटिसा जारी करते. त्यापैकी दोन मुख्य आहेत. एक यलो नोटीस आहे जी हरवलेल्या लोकांसाठी काढली जाते. याशिवाय आणखी एक रेड नोटीस आहे. जी वॉन्टेड गुन्हेगार/आरोपींसाठी आहे.

9/11

भारतपोल पोर्टल म्हणजे काय?

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

  भारतपोल पोर्टल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलेले डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे आणि नागरिकांना विविध पोलिस सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे. 

10/11

भारतपोलचा मुख्य उद्देश काय?

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

  नागरिकांना पोलीस सेवा, तक्रारी दाखल करणे आणि पोलीस संबंधित माहिती पारदर्शक करण्यासाठी एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.

11/11

तक्रारींचे ऑनलाइन निराकरण

Bharatpol and Interpol Difference work against criminals Marathi News

  भारतपोल पोर्टलचा वापर भारतातील सर्व नागरिक करू शकतात, पोलीस सेवा आणि तक्रारींचे ऑनलाइन निराकरण करायचे आहे, ते या पोर्टलचा वापर करु शकतात. तक्रारी दाखल करणे, पोलिसांशी संबंधित प्रमाणपत्रे घेणे, गुन्ह्यांशी संबंधित माहिती देणे यासारख्या सर्व सेवा या एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील.