Sourav Ganguly Daughter Net Worth: वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता सौरव गांगुलीच्या लेकीनं निवडली वेगळी वाट; किती कमाई करते माहितीये?

Sourav Ganguly Daughter Sana Ganguly: सौरव गांगुलीची लेक नेमकं काय करते, तिची इतकी चर्चा का सुरुय माहितीये?   

| Jan 07, 2025, 16:25 PM IST

Sourav Ganguly Daughter Sana Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली अनेकांचाच आवडता खेळाडू. किंबहुना आवडता कर्णधार. याच कर्णधाराची लाडकी लेक आता चर्चेचा विषय ठरतेय. 

 

1/7

सना गांगुली

sourav ganguly daughter name what does she do

Sourav Ganguly Daughter Sana Ganguly: वडील सौरव गांगुलीप्रमाणं त्याच्या लेकीनं म्हणजेच सना गांगुलीनं क्रिकेट क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला नाही. किंबहुना ती करिअरच्या एका वेगळ्या वाटेवर निघाली असून, तिची शैक्षणिक कारकिर्दसुद्धा अतिशय कमाल आहे.

2/7

सौरव गांगुली

sourav ganguly daughter name what does she do

सनाचा जन्म 2001 मध्ये झाला. तिचे वडील अर्थात सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधील एक सुप्रसिद्ध नाव. तर, आई, डोना गांगुली एक ओडिसी नृत्यांगना आहे.   

3/7

शिक्षण

sourav ganguly daughter name what does she do

सनानं कोलकाता येथील लोरेटो हाऊस इथून शालेय शिक्षण पूर्ण केलं असून, ही देशातील प्रतिष्ठीत शाळांपैकी एक आहे. इयत्ता बारावीमध्ये सनानं 98 टक्के मार्क मिळवले.   

4/7

उच्चशिक्षण

sourav ganguly daughter name what does she do

उच्च शिक्षणासाठी तिनं लंडनची वाट धरली. जिथं ती यूनिवर्सिटी कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये बी.एस.सी.चं पदवी शिक्षण घेतलं. PwC आणि डेलोईट यांसारख्या संस्थांमध्ये तिनं इंटर्नशिपही केली.   

5/7

लिंक्डइन

sourav ganguly daughter name what does she do

लिंक्डइन प्रोफाइलनुसार सना सध्या INNOVERV मध्ये सल्लागार म्हणून काम पाहतेय. तिनं शैक्षणिक कारकिर्द आणखी उंचावण्यासाठी म्हणून ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातून एक समर स्कूल कार्यक्रमही पूर्ण केला. सना सध्या तिच्या कामासोबतच CFA साठीचं प्रमाणपत्र शिक्षणही घेच असून, मॉर्गन स्टेनलीमध्येही तिनं मॅनेजमेंट अॅनालिस्ट म्हणून काम केलं आहे.     

6/7

नृत्यांगना

sourav ganguly daughter name what does she do

शिक्षणाव्यतिरिक्त सना आईप्रमाणंच एक प्रशिक्षित नृत्यांगना असून, तिनंही अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. वेळ मिळेल तेव्हा आणि वेळ मिळेल तसं तीसुद्धा या कलेचं सादरीकरण करत असते. आपल्या कारकिर्दीची सुरुवाच सनानं अतिशय प्रभावीपणे केली असून, अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये तिनं काम केलं आहे. एचएसबीसी, केपीएमजी, बार्कलेज, आईसीआईसीआई, PwC यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलं आहे.     

7/7

इंटर्नशिप

sourav ganguly daughter name what does she do

सूत्रांच्या माहितीनुसार PwC मध्ये इंटर्नशिपसाठी सनाला 30 लाख रुपयांचं पॅकेज होतं. तर, डेलॉईटमधील इंटर्नशिपसाठी तिला वर्षाला 5 ते 12 लाख रुपये मिळत होते असंही सांगितलं गेलं. राहिला प्रश्न सनाच्या श्रीमंतीचा तर, सनाच्या एकूण श्रीमंतीचा आकडा अद्यापही समोर आलेला नाही. पण, वजिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता सनानं केलेली कमाल सर्वांचीच मनं जिंकत आहे.