शत्रूच्या नजरेआड 'या' भक्कम किल्ल्यावर लपवला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना, काह आहे महत्त्वं?

History : इतिहासात डोकावून पाहताना... 'या' किल्ल्यावर लपवला जात होता स्वराज्यातील खजिना. पण, काय आहे त्या किल्ल्याचं महत्त्वं? कुठे आहे हा गड?   

Feb 04, 2025, 11:36 AM IST

महाराष्ट्राला कणखर देशा... अशीही ओळख असून याच महाराष्ट्राला अनेक गडकिल्ल्यांचं देणं लाभलं आहे. अशाच या गडकिल्ल्यांमधील एका किल्ल्याची माहिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

1/7

गडकिल्ले

why Shivaji maharaj Stored His Treasure in lohagad

फक्त महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण भारत देशात अनेकविध प्रकारचे गडकिल्ले असून, प्रत्येक गडाचं आपलं असं एक महत्त्वं आहे. त्यातलाच एक किल्ला इतका महत्त्वाचा, की जिथं खुद्द शिवरायांच्या स्वराज्याचा खजिना लपवला जात होता असं म्हटलं जातं.   

2/7

लोहगड

why Shivaji maharaj Stored His Treasure in lohagad

समुद्रसपाटीपासून साधारण 3400 फूट इतक्या उंचीवर असणारा हा किल्ला 18 व्या शतकात बांधण्यात आला. लोहगड, असं या किल्ल्याचं नाव असून, मराठा शासकांशिवाय या किल्ल्यावर विदर्भ शासकांचंही अधिपत्य पाहायला मिळालं. 

3/7

खजिना

why Shivaji maharaj Stored His Treasure in lohagad

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला अतीव महत्त्वं होतं. कारण, ही तिच जागा होती जिथं त्यांचा खजिना ठेवला जात होता.   

4/7

शिलेदार

why Shivaji maharaj Stored His Treasure in lohagad

मराठा साम्राज्यातील अनेक शिलेदार या किल्ल्याचं रक्षण करत असत. हा किल्ला खऱ्या अर्थानं अभेद्य होता. कारण, इथवर पोहोचणं जवळपास शत्रूला अशक्यत होतं. 

5/7

प्राधान्य

why Shivaji maharaj Stored His Treasure in lohagad

महाराष्ट्राच्या इंद्राणी खोऱ्यामध्ये हा किल्ला आजही उभा असून, या किल्ल्याच्या भक्कमपणामुळं आणि शत्रूच्या नजरेआड असण्यामुळं इथंच खजिना ठेवण्यास प्राधान्य दिलं जात असे असं म्हटलं गेलं. 

6/7

सूरतेची लूट

why Shivaji maharaj Stored His Treasure in lohagad

इतिहासकारांच्या मते मराठा साम्राज्यानं सूरतेची लूट केल्यानंतर तिथून आणलेला ऐवजही इथंच ठेवण्यात आला होता. ज्यामुळं या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त होतं.   

7/7

आकर्षणाचा विषय

why Shivaji maharaj Stored His Treasure in lohagad

आजच्या घडीला इतिहासाच्या पाऊलखुणांशिवाय हा किल्ला अनेक साहसप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. ट्रेकिंग आणि तत्सम गोष्टींसाठी इथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा राबता पाहायला मिळतो.