दिग्गज क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकी सध्या काय करतात? कोणी अभिनेत्री तर कोणी CA

Indian Cricketers Daughters : भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे देखील अनेक चाहते आहेत. क्रिकेटर्स हे नेहमी लॅमलाईटमध्ये असताच पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमी उत्सुक असतात. तेव्हा तुम्हाला आज भारतातील दिग्गज क्रिकेटर्सच्या मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या विविध क्षेत्रात आपल्या पालकांचं नाव उंचावत आहेत.  

Pooja Pawar | Feb 03, 2025, 15:38 PM IST
1/8

माजी दिग्गज क्रिकेटर मन्सूर अली खान पाटौदी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. यातील सोहा अली खान आई प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री असून दुसरी मुलगी सबा अली खान ही बिझनेस वुमन आहे.   

2/8

दिग्गज क्रिकेटर आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी भाटिया यांना एक मुलगी असून जिचं नाव 'अमिया' असं आहे. अमिया देव ही सध्या सिनेसृष्टीत कार्यरत असून तिने कपिल देव यांच्यावर आधारित चित्रपट '83' मध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले होते. 

3/8

मराठमोळा क्रिकेर आणि भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे याला दोन मुली आहेत. अनिल कुंबळेची सावत्र मुलगी अरुणी ही पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर लहान मुलगी स्वस्ति कुंबळे ही सध्या शिक्षण पूर्ण करत आहे. 

4/8

क्रिकेटर सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली हिने उच्च शिक्षणासाठी लंडनची वाट धरली. जिथं तिने यूनिवर्सिटी कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये बी.एस.सी.चं पदवी शिक्षण घेतले. PwC आणि डेलोईट यांसारख्या संस्थांमध्ये तिने इंटर्नशिपही केली.  लिंक्डइन प्रोफाइलनुसार सना सध्या INNOVERV मध्ये सल्लागार म्हणून काम पाहतेय. 

5/8

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदवीउत्तर शिक्षण घेतलं आहे.  सारा तेंडुलकर STF इंडिया (सचिन तेंडुलकर फाउंडेशन, भारत) मध्ये संचालिका म्हणून काम करत आहे. 

6/8

माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूची मुलगी रबीबा ही इंडियन फॅशन स्टायलिस्ट आणि डिरेक्टर आहे. रबीबा ही सुद्धा मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे. 

7/8

माजी क्रिकेटर संजय मांजरेकर आणि पत्नी माधवी यांना देविका आणि सिद्धार्थ अशी दोन मुलं आहेत. यातील देविका हिने पदवी शिक्षण घेतलं असून ती फूड ब्लॉगर आहे. तिला सोशल मीडियावर जवळपास १६ हजार लोक फॉलो करतात तसेच तिचा स्वतःच किचन स्टुडिओ देखील आहे. 

8/8

भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांची पूर्व पत्नी रितू सिंह यांना अलेका नावाची मुलगी आहे. मुलगी अलेका ही ४ वर्षांची असताना रवी शास्त्री आणि रितू सिंह यांचा घटस्फोट झाला. मुलगी अलेका शास्त्री ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नाही. अलेका ही आई प्रमाणे शास्त्रीय नृत्यांगना आहे.