इथल्या मुली लग्नासाठी आहे आसुसल्या, सुंदरता असून एकही वर मिळत नाही; अविवाहित असाल तर लगेचच तिकीट काढा

सुंदर तरुणी, लग्नाचं वय, वधू लग्नासाठी तयार पण त्यांना वरच मिळत नाही. जगाच्या पाठीवर असं एक जागा आहे, जिथे तरुणी लग्नासाठी आसुसलेल्या आहेत. यामागील कारणही तेवढंच थक्क करणार आहे. 

नेहा चौधरी | Feb 02, 2025, 22:50 PM IST
1/8

तरुण असो किंवा तरुणी, लग्न हे सर्वांचं स्वप्न असतं. पण आयुष्यातील घडणाऱ्या कारणामुळे अनेकांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होतं नाही. त्यामागे असंख्य कारण लपलेली असतात. पण आज आम्ही अशा जागेबद्दल सांगणार आहोत, जिथे वधू लग्नासाठी तयार आहे, पण वरच नाहीत.  

2/8

होय, जगात एक अशी जागा आहे जिथे तरुणी लग्नासाठी आसुसलेल्या असतात, पण त्यांना एकही नवरा मुलगा सापडत नाही. यामागील कारण तेवढंच थक्क करणार आहे. 

3/8

आम्ही बोलत आहोत, ब्राझीलच्या नोइवा गावाबद्दल. जिथे सुमारे 600 महिला आहे, आज आजही नवरदेवाची वाट पाहत आहेत. खरं तर या गावातील लिंग गुणोत्तर पाहिलं तर ते खूप असंतुलित आहे. इथे पुरुषांची संख्या खूपच कमी आहे.   

4/8

गावातील माणसे रोजगाराच्या शोधात शहरात जातात आणि ते गावाकडे परत नाही. शेती, पशुपालन अशी सर्व कामे महिला स्वत: करतात, त्यामुळे त्या स्वावलंबी आहेत पण एका जीवनसाथीची कमी त्यांच्या आयुष्यात आहे. 

5/8

विशेष म्हणजे इथल्या महिला लग्नासाठी इतक्या आसुसलेल्या आहेत की, त्या लग्नासाठी पुरुषांना आर्थिक मदत करायला तयार आहेत. बस या वराने लग्नानंतर गावातच राहवे, अशी या महिलांची इच्छा आहे. पण पुरुष गावात राहिला तयार नाहीत.  

6/8

लग्नाअभावी अनेक महिलांचं वय वाढूनही अविवाहित राहतात. ही परिस्थिती समाजातील बदलते प्राधान्यक्रम आणि जीवनशैली प्रतिबिंबित करते, जिथे पारंपारिक व्यवस्था आव्हानांना तोंड देताना तुम्हाला पाहिला मिळेल. 

7/8

दुसऱ्या एका अहवालानुसार, गावातील कठोर नियमांमुळे, अनेक मुले येथे राहण्यास इच्छुक नाहीत. ज्या मुलाने त्यांच्याशी लग्न केलं त्याने गावातच राहावे आणि जुन्या काळातील नियमांचे पालन करावे, अशी महिलांची इच्छा असते.

8/8

गावात काही पारंपारिक नियम आणि कायदे आहेत, जे पुरुषांना पाळायला आवडत नाहीत. बाहेरचे पुरुषही या गावात राहणे आणि महिलांचे नियम पाळणे टाळतात.