Weekly Horoscope : गजकेसरी राजयोग या राशींसाठी भाग्यशाली, कामात मिळणार नवीन उंची, धनलाभाचे योग

Weekly Horoscope 03 to 09 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गजकेसरी राजयोग असल्यामुळे हा शुभ योग अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक प्रगतीसह करिअरमध्ये उंची वाढणार आहे. तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमची छाप पाडण्यात यशस्वी होणार आहात. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून  

नेहा चौधरी | Feb 02, 2025, 18:18 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या राशीचे लोक फेब्रवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिकदृष्टीकोनातून बघायचं तर या आठवड्यात तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुम्हाला नशिबाची साथ पूर्णपणे मिळणार आहे. कुटुंबात सुख-समृद्धीची असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंदी असणार आहात. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचेही शुभ योग आहेत. तुमच्या जीवनात प्रगती येणार आहे. प्रिय व्यक्तीसोबत प्रवास केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहेत. तुमचा आनंद आणि समृद्धीत वाढ होणार आहे. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागणार आहे. तुमचा व्यवसाय प्रगतीकडे वाटचाल करणार आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व योजना यशस्वी होणार असून नशीब तुम्हाला साथ देणार आहे. शुभ दिवस : 3, 6  

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात ऑफिस किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवासात यश प्राप्त होणार आहे. महिलेच्या मदतीने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यशाला गवसणी घालता येणार आहे. तुमचे आयुष्य आनंदात जाणार असून तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. तुम्ही तुमच्या प्रवासात यशस्वी व्हाल आणि प्रत्येक बाबतीत नशीब तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. तुम्हाला अचानक करिअरशी संबंधित काही माहिती मिळणार असून ज्यामुळे तुमचे नुकसान होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. आर्थिक बाबींमध्ये अधिक खर्च होणार असून आपण कोणताही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. तब्येतीत सुधारणा आणि तुम्हाला उत्साही असा हा आठवडा असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, वडिलांसंबंधी तुमची चिंता वाढणार आहे. शुभ दिवस: 4,8

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आर्थिक लाभाची शक्यता असून प्रत्येक कामात प्रगती होणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे. आर्थिक लाभामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहणार आहे. कुटुंबात परस्पर प्रेम असणार असून तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. तुमचा वेळ शुभ कार्यात व्यतित होणार आहे. या आठवड्यात ऑफिसच्या कामात तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मदत लाभणार आहे. तुमच्या सर्व योजना यशस्वी होणार असून नोकरीच्या ठिकाणी महिलेमुळे अडचणी मात्र वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा तुम्हाला त्रासदायक ठरले. आठवड्याच्या शेवटी सुरू झालेले कोणतेही काम तुम्हाला दीर्घकाळ लाभ देणार आहे. शुभ दिवस : 7, 9

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत वेळ खूप अनुकूल असणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात आर्थिक लाभ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सुधारणा पाहिला मिळेल. तुम्हाला तुमच्या बॉसचे तसंच ऑफिसमधील तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. आरोग्यात चांगली सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुमची प्रगती पाहिला मिळेल. कुटुंबात सुख-समृद्धी नांदणार आहे. तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीबद्दल खूप उत्सुक असणार आहात. या आठवड्यात तुम्हाला कोणत्याही दोन ठिकाणी प्रवास केल्यासारखे वाटणार आहे. सहली गोड आठवणी घेणार आहेत. आठवड्याच्या शेवटी संघर्ष टाळल्यास चांगले फायदे मिळणार आहेत. या आठवड्यात तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीचे सुवर्ण योग आहेत.  शुभ दिवस : 5,7,9  

5/12

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही ज्या प्रकल्पांवर काम करत आहात त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रगतीचे मार्गाकडे वाटचाल सुरु होणार आहे. तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची इच्छा असणार आहे. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल राहणार आहे. संयमाने गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ मिळेल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात शांतता असेल आणि तुमची प्रगती होणार आहे. आरोग्यविषयक क्रियाकलाप तुमच्यासाठी शुभ परिणाम असतील. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातून यश मिळणार आहे तुमचा सन्मान देखील वाढणार आहे. तुम्हाला यशासह मान देणारा हा आठवडा असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. शुभ दिवस: 5, 7, 9

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत सुख-समृद्धीची शुभ शक्यता आहे. तुमची प्रगती होणार असून तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे शुभ परिणाम मिळतील. या आठवड्यात तुमच्या घरी नवीन वाहन येणार आहेत. आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होणार आहे. तुमची सतत प्रगती पाहिला मिळेल. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत बरेच बदल देखील करणार आहात. तुमच्या जोडीदाराच्या सहवासात तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके भविष्याभिमुख असाल तितके तुम्ही यशस्वी होणार आहात. काही नवीन आरोग्य कार्यात यश मिळणार आहे. तुम्हाला कुटुंबातील तरुणाकडून मदत लाभणार आहे. तोही तुम्हाला मदत करणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी, तुमच्या जीवनात तुमच्या जवळच्या लोकांसाठी तुम्हाला खूप जबाबदार वाटेल. शुभ दिवस : 3, 9

7/12

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभ आणि आर्थिक बाबतीत प्रगतीचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी फायदा होणार आहे. तुम्ही व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करणार आहात. महिलाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. महिलेच्या मदतीने प्रगतीच्या शुभ संधी निर्माण होणार आहे. आर्थिक परिस्थिती अडचणी आणणार आहे. या महिन्यात तुम्हाला काही अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहे. अन्यथा तुम्हाला काही आजार विळख्यात घेतली. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी परस्पर अंतर वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी चर्चेतून प्रकरणे सोडवली तर बरे परिणाम मिळणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे, तुमच्या सन्मानात वाढ पाहिला मिळेल. शुभ दिवस: 8,9

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होणार असून तुमच्या आयुष्यात प्रगती पाहिला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या वाटेवर वाटचाल सुरु होणार असून कोणत्याही नवीन प्रकल्पाबाबत मनात काही शंका असली तरी शेवटी यश तुम्हालाच मिळणार आहे. आर्थिक बाबतीत, आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक पैशात वाढ पाहिला मिळणार आहे. प्रवासामुळे अडचणी बदलू शकतात आणि मन अस्वस्थ राहणार आहे. कुटुंबातील एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल तुम्हाला वाईट वाटणार आहे. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुधारणा होणार आहे. तुमच्या आनंदात वाढ पाहिला मिळेल. तुम्हाला जीवनात यश प्राप्त होणार आहे. तुमच्या आनंदात वाढ असेल. तुमच्या योजना यशस्वी होणार आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ पाहिला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रगती आणि वाढ असणार आहे. शुभ दिवस : 5, 8

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक असणार आहे. समतोल राखून पुढे गेल्यास तुमचा प्रत्येक निर्णय योग्य ठरणार आहे. आयुष्यात पुढे गेलात तर आयुष्यात आनंदी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात यश आणि तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. कामाच्या ठिकाणी संवादाने प्रश्न सोडवले तर बरे परिणाम मिळणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने निर्णय घेतील. कुटुंबात परस्पर प्रेम असणार आहे. तरीही तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटणार आहे. आर्थिक बाबतीत गोड-आंबट अनुभव तुम्हाला येणार आहेत. या आठवड्यात कोणत्याही वादामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतील. आठवड्याच्या शेवटी काही बदल झाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. तुमच्यासाठी प्रगतीची शक्यता आहे आणि तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळतील. शुभ दिवस: 8,9

10/12

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी प्रगतीकडे वाटचाल सुरु होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि भरपूर सन्मान प्राप्त होणार आहे. भागीदारीच्या कोणत्याही कामातून तुम्हाला यश मिळणार आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला आनंद आणि तुमच्या सहकाऱ्यांशी चांगला समन्वय पाहिला मिळेल. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तब्येतीत बरीच सुधारणा पाहिला मिळेल. तुम्हाला आराम मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात. परस्पर प्रेम वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातही यश आणि तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी सुखद अनुभव येणार आहे. शुभ दिवस : 5, 6

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. प्रगतीचा मार्ग मोकळा त्यांच्यासाठी मोकळा होणार आहे. कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. आर्थिक बाबींसाठीही काळ अनुकूल राहणार असून आर्थिक लाभाची स्थिती असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आर्थिक बाबींमध्ये खूप व्यस्त राहणार आहात. कुटुंबाच्या सहवासात तुम्ही आनंददायी वेळ घालवणार आहात. तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. या आठवड्यात प्रवासातूनही यश मिळणार आहे. प्रवासातून गोड आठवणी निर्माण होतील. सप्ताहाच्या शेवटी महिलेच्या सहकार्याने जीवनात सुख-समृद्धीच्या शुभ संधी असणार आहेत. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि व्यवसायात प्रगती पाहिला मिळणार आहे. काही नवीन कल्पनाही तुमच्या मनात येणार आहेत. शुभ दिवस : 7, 9

12/12

मीन (Pisces Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार असून प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला मातृकाची मदत मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्येही तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. नवीन विचाराने केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी आर्थिक लाभाची असणार आहे. तुमच्या अंतर्मनानुसार निर्णय घेतल्यास संपत्तीत वाढ होणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. तुम्हाला कुठूनतरी प्रगतीची चांगली बातमी कानावर पडणार आहे. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे तुमचे स्वप्न या आठवड्यात पूर्ण होणार आहेत. शुभ दिवस : 6,8,9 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)