तृतीयपंथी मराठी अभिनेत्रीने केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाली, 'गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने...'

मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या तृतीयपंथी अभिनेत्रीने नुकतच लग्न केलं आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीये. 

Soneshwar Patil | Feb 02, 2025, 16:06 PM IST
1/7

मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री प्रणित हाटे हिनं लग्न केलं असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. प्रणितने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

2/7

अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, गणपती बाप्पााच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात. त्यासोबतच  तिनं #married #justmarried असे हॅशटॅग देखील दिले आहेत.

3/7

सध्या तिच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून ते चर्चेचा विषय बनले आहेत. नेटकरी देखील तिंच अभिनंदन करत आहेत. 

4/7

अभिनेत्रीने फोटो शेअर करताना तिच्या नवऱ्याची ओळख लपवली आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

5/7

चाहत्यांनी खरंच लग्न केलं की मालिकांच्या प्रमोशनसाठी असे फोटो टाकले आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे.  

6/7

प्रणितने झी मराठीच्या 'कारभारी लयभारी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने गंगाची भूमिका साकारली होती. 

7/7

वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत प्रणितने मराठी अभिनयक्षेत्रात नाव कमावलं. आता तिने लग्न करत आयुष्यातील पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.