T20 World Cup: वर्ल्डकपसाठी ICC कडून मोठा नियम जाहीर; 'या' सामन्यांसाठी होणार रिझर्व्ह डे

T20 World Cup 2024: टीम इंडियाचं लक्ष्य आता टी-20 वर्ल्डकपवर आहे. आयपीएल संपल्यानंतर भारताला टी-20  वर्ल्डकप खेळायचा आहे. यंदाच्या जून महिन्यात याचं आयोजन करण्यात आलंय. 

Surabhi Jagdish | Mar 16, 2024, 09:23 AM IST
1/7

यंदाच्या टी-20 चाहत्यांना वर्ल्ड कपमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यावेळी वर्ल्डकपमध्ये एकूण 20 टीम सहभागी होणार आहेत. 

2/7

दरम्यान आयसीसीने वर्ल्डकपबाबत काही नवीन नियम जाहीर केले आहेत. 

3/7

या अंतर्गत कोणत्या सामन्यांसाठी राखीव दिवस असणार आहे, याची देखील माहिती देण्यात आली आहे.

4/7

ICC च्या बैठकी दरम्यान, T20 वर्ल्डकप 2024 मध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस असतील याची माहिती देण्यात आली.   

5/7

याशिवाय ग्रुप स्टेज आणि सुपर आठ टप्प्यातील खेळ आयोजित करण्यासाठी दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या टीमला किमान पाच ओव्हर टाकाव्या लागतील. 

6/7

मात्र, बाद फेरीतील सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात किमान 10 ओव्हर्स टाकावी लागतात.   

7/7

रिझर्व्ह डे म्हणजे जर काही कारणास्तव सामना त्याच्या नियोजित दिवशी रद्द झाला, तर तो सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे रिझर्व्ह डेला आयोजित केला जाईल.