भारत मंडपापेक्षाही मोठे, 11 हजारांची बसण्याची सोय; पंतप्रधान मोदी दिल्लीला समर्पित करणार 'यशोभूमी'

Yashobhoomi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी द्वारका येथील यशोभूमी नावाचे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (IICC) राष्ट्राला समर्पित करणार आहेत. पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासोबतच ते द्वारका सेक्टर-21 ते द्वारका सेक्टर-25 पर्यंत दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइनच्या विस्ताराचे उद्घाटनही करतील.

Sep 16, 2023, 16:19 PM IST
1/10

यशोभूमीमुळे पंतप्रधानांचे स्वप्न होणार पूर्ण

Yasobhoomi will fulfill the PM Modi dream

अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. द्वारकेतील यशोभूमीमुळे हे पूर्ण होणार आहे.

2/10

1.8 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळात बांधकाम

Construction in an area of more than 1.8 lakh square meters

8.9 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या आणि 1.8 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रात पसरलेला हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या MICE सुविधांपैकी एक असेल.

3/10

कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुविधा काय?

What are the facilities at the convention center

73 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 मीटिंग हॉलसह 15 कन्व्हेन्शन हॉल आहेत. ज्यांची एकूण क्षमता 11,000 लोक इतकी आहे. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठी एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहे.

4/10

कन्व्हेन्शन सेंटरच्या मुख्य सभागृहात 6,000 पाहुण्यांची बसण्याची क्षमता

convention center's main auditorium has a seating capacity of 6,000 guests

कन्व्हेन्शन सेंटरच्या मुख्य सभागृहात सुमारे 6,000 प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. सभागृहात लाकडी फ्लोअरिंग असेल. स्वयंचलित खुर्च्याही बसविण्यात येणार आहेत. यासोबतच सभागृहाच्या भिंतींवर साऊंड पॅनेल्स बसवण्यात येणार असून, त्यामुळे पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल.

5/10

कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भव्य बॉलरूम

Grand Ballroom in Convention Center

कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका वेळी 2,500 पाहुण्यांना सामावून घेण्यासाठी भव्य बॉलरूम असेल. 500 लोक बसू शकतील असा मोठा खुला परिसर देखील असेल. आठ मजल्यांच्या या इमारतीमध्ये 13 मीटिंग हॉलमध्ये विविध स्तरांच्या बैठका आयोजित केल्या जाऊ शकतात.

6/10

यशोभूमी जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन दालनांपैकी एक

Yasobhoomi is one of the largest exhibition halls in the world

यशोभूमी हे जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन दालनांपैकी एक असेल. 1.07 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधण्यात आलेल्या या प्रदर्शन हॉलचा वापर प्रदर्शन, व्यापार मेळावा आणि व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जाईल.

7/10

सौरदिव्यांद्वारे प्रकाश योजना

Lighting scheme by solar lights

हे कन्व्हेन्शन सेंटर तांब्याच्या छतासह अद्वितीय पद्धतीने डिझाइन केले आहे. त्यात सौरदिव्यांद्वारे प्रकाश येईल. या लॉबीमध्ये मीडिया रूम, व्हीव्हीआयपी लाउंज, क्लॉक सुविधा, माहिती केंद्र, तिकीट इत्यादी विविध क्षेत्रे असतील

8/10

भारतीय संस्कृतीपासून प्रेरित वस्तूंचा समावेश

Incorporating items inspired by Indian culture

यामध्ये टेराझो फ्लोअर्स, ब्रास इनले आणि भारतीय संस्कृतीपासून प्रेरित वस्तूंचा समावेश असेल. यामध्ये प्रतिध्वनी नियंत्रित करण्यासाठी काही उपकरणे देखील असतील. यशोभूमीत 100 टक्के सांडपाणी पुनर्वापर, पाणी साठवण, सोलर पॅनेलसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रणाली वापरणार आहे.

9/10

IICC पासून जवळच हॉटेलची सुविधा

Hotel facilities close to IICC

IICC पासून पाच ते 10 किलोमीटर अंतरावर मोठ्या संख्येने पंचतारांकित हॉटेल्स आहेत, ज्यात 3500 हून अधिक खोल्या उपलब्ध आहेत. भविष्यात त्यांची संख्या सात हजारांच्या आसपास वाढण्याची शक्यता आहे.

10/10

नवी दिल्ली ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 पर्यंतच्या प्रवास सोपा

Easy journey from New Delhi to Yasobhoomi Dwarka Sector 25

द्वारका सेक्टर 25 मधील नवीन मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासह, ते दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइनला देखील जोडले जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली मेट्रो एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवरील मेट्रो ट्रेनचा ऑपरेटिंग वेग 90 किमी/तास वरून 120 किमी/ताशी वाढवेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. नवी दिल्ली ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 पर्यंतच्या प्रवासाला अंदाजे 21 मिनिटे लागतील.