वीकेंडला मनोरंजनाचा धमका, अक्षय कुमारचे OTT वरील 'हे' कॉमेडी चित्रपट नक्की बघा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच OTT वरील अक्षयच्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

Soneshwar Patil | Feb 08, 2025, 17:52 PM IST
1/7

कॉमेडी चित्रपट

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच OTT वरील अक्षयच्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

2/7

'दीवाने हुए पागल'

अक्षय कुमारचा 2005 मध्ये 'दीवाने हुए पागल' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सुनील शेट्टी आणि परेश रावल हे कलाकार होते. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. 

3/7

'खट्टा मीठा'

'खट्टा मीठा' हा चित्रपट अक्षय कुमारच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

4/7

'हेरा फेरी'

अक्षय कुमारचा 'हेरा फेरी' हा चित्रपट देखील खूप कॉमेडी आहे. आजही या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. 

5/7

'खेल खेल में'

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात फरदीन खान आणि एमी विर्क देखील होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. 

6/7

'हाऊसफुल 4'

अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 4' हा चित्रपट तुम्हाला खळखळून हसवायला भाग पाडेल. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

7/7

'भागम भाग'

अक्षय कुमारचा 2006 मध्ये प्रदर्शित झालेला 'भागम भाग' हा कॉमेडी चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. यामध्ये परेश रावल आणि गोविंदा देखील दिसले होते.