1/5
सारा- कार्तिकने शब्दांवाटे व्यक्त केल्या एकमेकांप्रतीच्या भावना

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा वर्तुळांमध्ये असणारी जोडी आहे. अर्थात त्याला कारणंही तशीच आहेत. कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचंम्हणत साराने साऱ्या कलाविश्वाचं लक्ष वेधलं होतं. ज्यानंतर पुढे या जोडीची रणवीर सिंगने भेट घडवून आणली. दिग्दर्शनक इम्तियाज अली याने तर, सारा- कार्तिकला त्याच्या आगामी चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठीच निवडलं. 'लव आज कल २' या चित्रपटासाठी त्यांची निवड झाली आणि ही जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदात एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/5
सारा- कार्तिकने शब्दांवाटे व्यक्त केल्या एकमेकांप्रतीच्या भावना

नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. जवळपास ६६ दिवासांच्या सातत्यपूर्ण चित्रीकरणानंतर 'लव आज कल २' या चित्रपच्या टीमने 'इट्स अ रॅप' असं म्हणत चित्रीकरण संपल्याची अधिकृत घोषणा केली. तीन महिन्यांहून अधिक काळ सारा, कार्तिक, इम्तियाज अली आणि चित्रपटाची संपूर्ण टीम ही एकत्र होती. त्यामुळे अर्थातच त्यांच्यात एक खास नातं आकारास आलं असणार. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चित्रपटा चित्रीकरणादरम्यानच्या अखेरच्या दिवशी पोस्ट करण्यात आलेले फोटो पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
3/5
सारा- कार्तिकने शब्दांवाटे व्यक्त केल्या एकमेकांप्रतीच्या भावना

4/5
सारा- कार्तिकने शब्दांवाटे व्यक्त केल्या एकमेकांप्रतीच्या भावना

फक्त इतकंच नव्हे तर, या पोस्टच्या माध्यमातून सारा आणि कार्तिकने एकमेकांप्रतीच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ज्यासाठी त्यांनी शब्दांचा आधार घेतला आहे.' या संपूर्ण प्रवासात साराहून चांगली साथीदार कोणी नसेलच', असं मोठ्या विश्वासाने लिहित त्याने तिच्या उल्लेख 'प्रिन्सेस' म्हणजेच राजकन्या असा केला आहे. पुन्हा पुन्हा तुझ्यासोबत काम करण्यास आवडेल असंही त्याने स्पष्ट केलं आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
5/5
सारा- कार्तिकने शब्दांवाटे व्यक्त केल्या एकमेकांप्रतीच्या भावना
