'या' ऐतिहासिक वास्तूत प्रियांकाला लागणार हळद, लग्चाच्या खर्चाचा आकडा....

Nov 28, 2018, 09:43 AM IST
1/5

'या' ऐतिहासिक वास्तूत प्रियांकाला लागणार हळद, लग्चाच्या खर्चाचा आकडा....

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तारीख जवळ येत असून, सध्या या जोडीवर चाहते आणि माध्यमांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेक बी टाऊन सेलिब्रिटी परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करत असताना प्रियांकाने मात्र मायदेशीच विवाहबद्ध होण्याचा निर्यण घेतला आहे. 

2/5

'या' ऐतिहासिक वास्तूत प्रियांकाला लागणार हळद, लग्चाच्या खर्चाचा आकडा....

सध्याच्या घडीला 'देसी गर्ल'च्या लग्नसोहळ्यासाठी पाहुणे मंडळी येण्यास सुरुवात झाली असून, तिच्या लग्नविधींनाही आता लवकरच सुरुवात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाची हळद आणि मेहंदी समारंभ राजस्थानमधील मेहरानगढ किल्ल्यात होणार आहे. २९ डिसेंबरपासून या सर्व समारंभांना सुरुवात होईल. 

3/5

'या' ऐतिहासिक वास्तूत प्रियांकाला लागणार हळद, लग्चाच्या खर्चाचा आकडा....

मेहरानगढच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता थेट ५०० वर्षांपूर्वीच्या काळात आपण पोहोचतो. अनेक ठिकाणी नमूद केल्यानुसार १२ मे १४५९ मध्ये या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ज्यानंतर महाराज जसवंत सिंह (१६३८-७८) यांनी यांच्या काकिर्दीत या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं होतं. जोधपूरची शान म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला १२० मीटर उंच टेकडीवर उभा आहे. तसं पाहिलं तर दिल्लीच्या कुतूबमिनारापेक्षाही त्याची उंची जास्त आहे. सात दरवाजे असणाऱ्या या किल्ल्यात सती मातेचं देऊळही आहे. 

4/5

'या' ऐतिहासिक वास्तूत प्रियांकाला लागणार हळद, लग्चाच्या खर्चाचा आकडा....

जोधपूर विमानतळावरुन प्रियांचा, निक आणि त्यांचे कुटुंबीय त्यानंतर उमेदभवन पॅलेस येथे जाणार असल्याचंही कळत आहे. ज्या ठिकाणी २२ पॅलेस रुम आणि ४२ सुट असे एकूण ६४ आलिशान सुट आहेत. पॅलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाची आता एक नवी ओळख आहे. प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा हा जितका दिमाखदार असणार आहे तितकाच त्याचा खर्चही अनेकांनाच अवाक् करत आहे. मेहरानगढच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी डीएनएला दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाच्या विवाहसोहळ्यादरम्यान होणाऱ्या एका समारंभासाठीचा सेटअपच १० लाख रुपयांचा असणार आहे. खाण्य़ापिण्यासाठी माणसी १८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

5/5

'या' ऐतिहासिक वास्तूत प्रियांकाला लागणार हळद, लग्चाच्या खर्चाचा आकडा....

प्रियांकाच्या लग्नाची एकंदरच आकडेमोड पाहिली तर, अंदाजे हा संपूर्ण खर्च तब्बल ३ कोटी ९३ लाखांवर पोहोचत असल्याचं कळत आहे. त्याशिवाय ज्या पॅलेसचं बुकींग तिच्या विवाहसोहळ्यासाठी करण्यात आलं आहे, तेथे पॅलेस रुम ४७ हजार रुपये, ऐतिहासिक सुट ६५ हजार तीनशे रुपये, रॉयल सुट १. ४५ लाख रुपये, ग्रँड रॉयल सूट २.३० लाख रुपये आणि प्रेसिडेंशियल सूट ५.०४ लाख रुपये असल्याचं कळत आहे. ज्यामुळे त्या ठिकाणी एका दिवसाचा खर्च हा जवळपास ६४. ४० लाख रुपयांवर पोहोचत आहे. या सर्व आकड्यांची बेरीज केली असता फक्त पाच दिवसांच्या वास्तव्यासाठी देसी गर्ल तब्बल ३.२ कोटी रुपये मोजणार आहे. (यामध्ये लग्नापूर्वीचे समारंभ आणि पाहुण्याच्या खाण्यापिण्याचा खर्च जोडण्यात आलेला नाही.)