Photo : अनंत-राधिकाच्या संगीत कार्यक्रमात बॉलिवूड आणि क्रिकेट आलं एकत्र...

अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीतसोहळा जियो वर्ल्ड सेंटर येथे शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार पासून ते क्रिकेटर्सने हजेरी लावली.   

Jul 06, 2024, 12:53 PM IST

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याचा संगीत कार्यक्रम शुक्रावारी  पार पडला. या संगीत सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकांरांनी उपस्थिती दर्शवली असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

1/12

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीरला या संगीत सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. रणबीर, आलिया आणि तिच्या तिची बहीण शाहिनसोबत आली होती. या फोटोत आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट आणि रणबीर यांनी एकाच रंगाचे ड्रेस परिधान केले होते. 

2/12

अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यात धकधक गर्ल माधुरी देखील पोहोचली होती.या कार्यक्रमात माधुरीने नेसलेल्या गोल्डन रंगाची साडीमुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं.   

3/12

ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी देखील या संगीतकार्यक्रमाला उपस्थिती लावली.   

4/12

फक्त बॉलिवूडच नाही तर क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी देखील या कार्यक्रमात हजर होते.   

5/12

नुकतंच अर्जुन कपूरचं मलायकासोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच अर्जुन त्याची बहीण अंशुला कपूर सोबत कार्यक्रमात आला होता. 

6/12

संगीत कार्यक्रमात विद्या बालनने तिच्या पतीसोबत हजेरी लावली होती. विद्या बालनच्या हटके लूकमुळे ती चर्चेत आली आहे. 

7/12

अभिनेत्री अनंन्या पांडे आणि तिची आई  दोघींनी फिकट गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अनंन्याच्या लुक सगळ्यांच्या नजरा खिळून राहिल्या. याचबरोबर सारा अली खानने या कार्यक्रमात गोल्डन रंगाचा मॉर्डन आऊटफिट परिधान केला.  

8/12

मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि तिचा पती जहीर खान यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सागरिकाने फिकट गोल्डन रंगाच्या ट्रेडीशनल ड्रेस परिधान केला तर जहीरने काळ्या रंगाचा सुट परिधान केला होता. 

9/12

जान्हवी कपूरची लहान बहीण खुशी कपूर' या संगीत सोहळ्यात फिकट गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर जांभळ्या रंगाच्या ड्रेसवर मोरपिसांचं सुंदर नक्षीकाम केलेल्या ड्रेसमध्ये जान्हवीचं सौंदर्य खुलून दिसत होतं. 

10/12

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया  यांनी देखील सोहळ्यात उपस्थिती लावली होती. रितेशने पारंपारिक पांढऱ्या रंगाचा कुर्ता तर जेनेलियाने डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.  

11/12

पांढऱ्या रंगांचा आऊट फिट आणि त्यावर डायमंड ज्वेलरी परिधान केल्याने 'मानुषी' खुपच सुंदर दिसत होती. तर बिग बींची नात आणि श्वेताची मुलगी नव्या लाल रंगाच्या  ड्रेसमध्ये नव्या खूपच सुंदर दिसत होती. 

12/12

अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यात अनंतची मावशी ममता दलाल आणि अनंतची आजी  पूर्णिमा दलाल यांचा पारंपारिक गुजराती लुकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.