मनुष्य 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करु शकतो का? उष्माघाताने मृत्यू कसा होतो?

Death because of heat :  राजधानी दिल्लीत उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. दिल्लीतल्या मुंगेशपूर येथे तापमान 52.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. या तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीकर होरपळून निघलेत. राजधानी दिल्लीत आज उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. पण माणूस किती उष्णता सहन करू शकतो? जाणून घ्या सविस्तर

| May 30, 2024, 23:57 PM IST
1/7

घराबाहेर पडू नका

भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताचे एकूण 5 रुग्ण उपचार घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्यात.

2/7

तुम्हाला माहितीये का?

मात्र, तुम्हाला माहितीये का? मनुष्य 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करु शकतो का? माणूस किती तापमान सहन करू शकतो? वाढत्या तापमानाचे शरिरावर परिणाम काय होतात?

3/7

सिडनी विद्यापीठ

लोक जास्त उष्ण तापमान आणि आर्द्रतेच्या वातावरणामध्ये जास्त आयुष्य जगू शकत नाहीत, असं सिडनी विद्यापीठातील अहवालात समोर आलंय. 

4/7

आर्द्रता

वातावरणात जितकी जास्त आर्द्रता जास्त असते तितकं शरीराला उष्णता नियंत्रित करता येत नाही, असं विद्यापीठाच्या अहवालाच्या रिपोर्टमधून समोर आलंय.

5/7

तापमान

सिडनी विद्यापीठातील थर्मल एर्गोनॉमिक्स प्रयोगशाळेतील केलेल्या प्रयोगानुसार, एखादी व्यक्ती जी सतत पाणी पिते आणि 10 टक्के आद्रता असलेल्या ठिकाणी राहते ती, 115 डिग्री फॅरेनहाइट किंवा 46.1 डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकते.

6/7

50 अंश सेल्सिअस

आणखी एका अहवालानुसार समोर आलेल्या माहितीनुसार, तापमान 122 अंश फॅरेनहाइट म्हणजेच 50 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानंतर मानवी शरीर उष्णता नियंत्रित करू शकत नाही.

7/7

लक्षणे

दरम्यान, उष्णतेमुळे जेव्हा शरिराचं तापमान वाढतं तेव्हा मळमळ, चक्कर येणे, डोकेदुखी, बेशुद्ध पडणे, शरीरात पाण्याची कमतरता, अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात. तर अनेकदा मृत्यू देखील होतात.