Chaitra Navratri 2023: नवरात्रीत उपवास करणे शक्य नसेल तर करा 'हे' काम, तरीही मिळेल देवीचा आशिर्वाद

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2023) 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीसाठी लोकांमध्ये खूप उत्साह असतो. या दरम्यान देवीचे भक्त 9 दिवस उपवास करतात. तर काही जणांना धावपळीच्या जीवनशैलीत नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही. अशावेळी तुमच्यासाठी काही खास उपाययोजना आहेत. 

Mar 21, 2023, 09:23 AM IST
1/5

हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa 2023 ) होते. त्याच दिवसापासून चैत्र नवरात्र (Chaitra Navratri 2023) देखील सुरू होते. म्हणजेचं यंदा चैत्र नवरात्री 22 मार्चला सुरु होत आहे. या चैत्र नवरात्रीतमध्ये काही गोष्टींची काळजी घेतली तर घरात सुख, शांती नांदेल. जाणून घेऊया या दिवसात ज्यांना उपवास शक्य नसेल त्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात... 

2/5

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैसीत अनेकांना चैत्र नवरात्रीचे उपवास करायचे असतात, पण त्यांना धावपळीमुळे शक्य होत नाही. जर तुम्हाला नऊ दिवस उपवास करता येत नसतील तर तुमच्या सामर्थ्यानुसार व सोयीनुसार सप्तत्र, पंचरात्र, त्रिरात्र किंवा एक रात्र युग्मरात्र उपवास करू शकतात.

3/5

प्रतिपदा ते सप्तमी तिथीपर्यंतच्या व्रताला सप्तरात्र व्रत म्हणतात. एक भुक्त म्हणजे पंचमीला एकदा भोजन, षष्ठीला नक्तव्रत म्हणजे रात्री भोजन, सप्तमीला आयचित, अष्टमीला उपवास आणि नवमीला पारण याने पंचरात्र व्रत पूर्ण होते.  

4/5

सप्तमी, अष्टमी आणि नवमीला एकच भोजन केल्याने त्रिरात्र व्रत पूर्ण होते. प्रतिपदा ते नवमी या दरम्यानच्या कोणत्याही एका तारखेला उपवास करून एक रात्र उपवास केला जातो आणि सुरुवातीच्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे प्रतिपदा आणि नवमी या दिवशी उपवास करून युग्मरात्र व्रत पाळले जाते.

5/5

जर तुम्हाला नऊ दिवस उपवास करता येत नसतील तर यापैकी कोणतेही व्रत तुम्ही निश्चयाने केल्यास तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि उपवासाचे पुण्य लाभ मिळेल.