भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई येथे सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले. या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये इतिहास रचला. 

Pooja Pawar | Feb 23, 2025, 19:53 PM IST
1/7

19 फेब्रुवारी पासून आयसीएस चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबई येथे खेळवले जात आहे. रविवारी स्पर्धेतील पाचवा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत - पाकिस्तान या संघांमध्ये खेळवला गेला. 

2/7

सामन्याचा टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तर भारताला प्रथम गोलंदाजीसाठी आव्हान दिले. यावेळी पाकिस्तानच्या संघाला ऑल आउट करण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आले. पाकिस्तानने 10 विकेट्स गमावून 241 धावा केल्या.  

3/7

टीम इंडियाच्या फलंदाजांपैकी कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने 2 आणि हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

4/7

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात उत्कृष्ट फिल्डिंगचे प्रदर्शन केले. विराट कोहलीने पाकिस्तानी फलंदाज नसीम शाह आणि खुशदिल शाह यांची कॅच घेतली. 

5/7

पाकिस्तानची इनिंग सुरु असताना 49.4 ओव्हरला कुलदीप यादवने टाकलेल्या बॉलवर खुशदिलने शॉट खेळला. तो शॉट बाउंड्री बाहेर जाऊ शकला नाही आणि विराट कोहलीने उत्कृष्ट फिल्डिंग करून कॅच पकडला, ज्यामुळे पाकिस्तानला ऑल आउट करण्यात यश आले. 

6/7

खुशदिलची कॅच घेऊन विराट कोहलीने वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक कॅच घेणारा खेळाडू ठरला. यापूर्वी हा रेकॉर्ड मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावावर होता. मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये 334 सामने खेळताना 156 कॅच पकडल्या होत्या. तर विराट कोहलीने 299 सामन्यात 158 कॅच घेतले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 463 सामन्यात 140 कॅच घेतले होते.   

7/7

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव