हवेत उडणाऱ्या Flying कारचे बुकिंग सुरु; 2025 मध्ये मिळणार डिलीव्हरी

2025 मध्ये हवेत उडणाऱ्या कार प्रत्यक्षात वापरात येणार आहेत.  Flying Car चे बु किंग सुरु झाले आहे.   

Jan 12, 2024, 16:32 PM IST

Xpeng AeroHT Flying Car:  वाहनचालकांना आता रस्त्यावरील ट्रॅफिकमधुन मुक्ती मिळणार आहे. हवेत उडणाऱ्या  Flying Car चे बु किंग सुरु झाले आहे. Xpeng AeroHT कंपनीची ही Flying Car आहे. 2025 मध्ये या कारची डिलीव्हरी मिळणार आहे. जाणून घेवूया या कारचे बेस्ट फिचर्स.

1/7

Xpeng AeroHT कंपनीने हवेत उडणारी Flying Car  लाँच केली आहे.   

2/7

 2025 मध्ये ग्राहक या फ्लाईक कारमधून प्रवास करणाऱ्याचा प्रत्यक्षात अनुभव घेवू शकतात असा दावा कंपनीने केला आहे.   

3/7

या कारमध्ये मॅन्युअल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग मोड आहेत.   

4/7

या कारमध्ये  4 ते 5  प्रवाशांची आसनव्यवस्था आहे. 

5/7

फ्लाईंग आणि ड्राईव्ह असे दोन मोड या कारमध्ये आहेत. एअर मॉड्यूल ऑप्शनमुळे कार हेलिकॉप्टरप्रमाणे हेवत टेक ऑफ करु शकते. तर ग्राउंड मॉड्यूल ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन या ऑप्शनच्या मदतीने कार जमीनीवर ड्राईव्ह केली जाते.   

6/7

या Flying Car चे डिझाईन दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. यामुळेच ही कार जमिनीवर तसेच हवेतही उडू शकते. या कारमध्ये इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग एअरक्राफ्ट (eVTOL) आहे. या तंत्रज्ञानामुळे कार रस्त्यावर धावू शकते. गरज पडल्यास ही कार विमानाप्रमाणे हवेतही उडू शकते. 

7/7

 XPENG ही चीनमधील आघाडीची टेक कंपनी आहे. अमेरिकेतील लास वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2024) मध्ये ही कार सादर करण्यात आली.