...अन् काजोल जया बच्चन यांच्यावर संतापली, प्रतिक्रिया पाहून नेटकरी आश्चर्यचकित, म्हणाले 'कमालच झाली'

काजोल आणि जया बच्चन यांच्या भेटीदरम्यान असं काही झालं जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.   

| Oct 02, 2024, 20:27 PM IST

काजोल आणि जया बच्चन यांच्या भेटीदरम्यान असं काही झालं जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

 

1/8

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आपल्या हसमुख आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखली जाते. तर दुसरीकडे जया बच्चन आपल्या रागिष्ट स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतात. (Photo Credit: Viral Bhayani Video)  

2/8

दरम्यान काजोल आणि जया बच्चन यांच्या भेटीदरम्यान असं काही झालं जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.   

3/8

सध्या देशभरात दुर्गा पुजेचा उत्साह आहे. बंगाली असल्याने काजोलदेखील नेहमीच नवरात्र साजरी करण्यासाठी उत्साही असते.   

4/8

शुभो महालयाच्या निमित्ताने काजोल, जया बच्चन, राणी मुखर्जी, अयान, तनुजा आणि तनिषा सर्वजण देवीच्या स्वागतासाठी एकत्र आले होते.   

5/8

यावेळी जया बच्चन तिथे मास्क घालून पोहोचल्या होत्या. जेव्हा फोटोग्राफर्सनी त्यांच्याकडे फोटोसाठी विनंती केली तेव्हा काजोलने त्यांना ओरडण्याचा अभिनय करत मास्क काढावा लागेल असं सांगितलं.   

6/8

यानंतर जया बच्चन यांना हसू अनावर झालं होतं. दोघी यानंतर हसत गप्पा मारताना दिसल्या.   

7/8

काजोल जया बच्चन यांच्यावर ओरडत असल्याचं पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटलं.   

8/8

दरम्यान यावेळी जया बच्चन हसत होत्या हे पाहून चाहते जास्त आश्चर्यचकित झाले आहेत. हे फक्त काजोल करु शकते अशा कमेंट्स ते करत आहेत.