बड्या कंपन्यांच्या 'या' CEO वरही नोकरकपातीची गदा; कोट्यवधींचं पॅकेज घेणाऱ्यांना एका क्षणात कामावरून काढलं

Cognizant या प्रख्यात कंपनीचे माजी CEO Brian Humphries सुद्धा त्यापैकीच एक. नुकत्याच समोर आलेल्या एका यादीनुसार त्यांना पदावरून terminated करण्यात आलं ज्यानंतर 15 मार्चपर्यंत ते कंपनीसाठी मुख्य सल्लागार म्हणून काम पाहत होते.   

Apr 26, 2023, 09:18 AM IST

Layoff News : 2022 या वर्षापासूनच जागतिक आर्थिक मंदीची सुरुवात झाली आणि त्या धर्तीवर अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या संस्थेतून कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली. विविध विभागांतील कर्मचाऱ्यांवर यावेळी नोकरी गमावण्याचं संकट ओढावलं या यादीत काही मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश होता. अर्थात नोकरकपातीपलीकडेही काही मोठ्या कारणांमुळं या मंडळींवर ही कारवाई करण्यात आली होती.  

1/8

स्टीव्ह जॉब्स

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

Humphries यांच्यासोबतच आणखीही काही सीईओंना त्यांचाय पदत्याग करावा लागला होता. यातलं पहिलं नाव आहे स्टीव्ह जॉब्स. एका टप्प्यावर अॅपलनं जॉब्स यांचीही साथ सोडली होती. 

2/8

लिओ अपोथॅकर

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

Hewlett Packard (HP) अर्थाच एचपी या संस्थेच्या सीईओपदी फार कमी काळासाठी असणाऱ्या Leo Apotheker यांनाही कंपनीनं बाहेरचा रस्ता दाखवला होता. कर्मचाऱ्यांशी संवाद न ठेवणं, संचालक मंडळाप्रमाणं काम न करणं असे आरोप त्यांच्यावर होते.   

3/8

कॅरल बार्ट्ज

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

Carol Bartz या Yahoo! च्या सीईओंना कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी एका फोनमध्ये त्यांना fire केल्याची माहिती दिली होती. 

4/8

अंकिती बोस

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

Zilingo या सिंगापूर स्थित एका फॅशन स्टार्टअपच्या सीईओपदी असणाऱ्या Ankiti Bose यांना आर्थिक गैरव्यवहाराचे अरोप करत कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.   

5/8

गिरीस परांजपे, सुरेश वासवानी

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

Wipro च्या CEO पदी असणाऱ्या गिरीश परांजपे आणि सुरेश वासवानी यांचं आणि कंपनीचं नातं 2011 मध्ये संपुष्टात आलं

6/8

मार्क हर्ड

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

लैंगिक छळाचा गंभीर आरोप झालेल्या HP CEO Mark Hurd यांना 2010 मध्ये कंपनीकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं.   

7/8

पनिश मूर्ती

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

iGate या आयटी कंपनीच्या सीईओपदी असणाऱ्या Phaneesh Murthy यांना कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करण्याप्रकरणी 2013 मध्ये या कारवाईचा सामना करावा लागला होता. 

8/8

पराग अग्रवाल

Cognizant CEO Brian Humphries Laid Off see who all were Fired IT Giants

एलन मस्क यांच्या हाती ट्विटर गेल्यानंतर नोकरी जाणाऱ्यांमध्ये येणारं पहिलं नाव होतं कंपनीच्या Parag Agrawal यांचं. ते नोव्हेंबर 2021 पासून ट्विटरच्या सीईओपदी होते.