रंगाची आवड सांगेल पर्सनॅलिटीतलं वेगळेपण, तुम्हाला कोणता रंग आवडतो?

Colors Psychology : तुमच्या आवडीचा रंग तुमच्या मनातील सगळ्याच गोष्टी सांगत असतात. तुमच्या पर्सनॅलिटीतील छुपी गोष्ट हे रंग अधोरेखित करतात. 

| Oct 04, 2024, 14:32 PM IST

तुमच्या आवडीचा रंग तुमच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल सांगत असतं. प्रत्येकाला आपल्या आवडीचा रंग, त्याच रंगाच्या कपडे परिधान करायला आवडतात. तुम्हाला पण आवडीचा रंग सतत जवळ असावा असं वाटत असेल तर त्यामागचे महत्त्व देखील समजून घ्या. 

1/7

लाल रंग

तुम्हाला देखील लाल रंग आवडतो का? हे लोक जीवनात खूप उत्साही अशतात. शब्दांबाबत या रंगाच्या आवडीचे लोक अतिशय सक्रिय असतात. एवढंच नव्हे तर कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात तुम्ही केंद्रस्थानी असता. तसेच तुम्ही भावना व्यक्त करण्यात अग्रस्थानी असतात. 

2/7

जांभळा रंग

जांभळ्या रंग आवडीचा असणाऱ्या प्रेमीयांसाठी काळ कष्टाचा असेल. कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करा. कधी कधी स्वतःवरच अविश्वास निर्माण होऊ शकतो. ऑफिसच्या सहकार्यांचा चांगला सहयोग मिळेल. वादापासून सावध राहा. 

3/7

हिरवा रंग

तुम्हाला हिरवा रंग आवडतो का? आपण स्वातंत्र्य आणि साहसी जीवनाचा आनंद घ्याल. तुम्ही सामाजिकदृष्ट्या सक्रिय असाल. व्यवसाय चांगला चालेल. त्यामुळे बिझनेसमध्ये लक्ष द्या. 

4/7

निळा रंग

निळा रंग ज्या व्यक्तींना आवडतो ते शांत आणि संतुलित स्वभावाचे असतात. तुम्ही कायमच दुसऱ्यांच्या गरजांचा विचार करतात. मित्र-परिवारांसोबत संबंध चांगले ठेवा. तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणताही वाद करणं टाळा. 

5/7

गुलाबी रंग

गुलाबी रंगाचे आवडते प्रेमी अतिशय आकर्षक असतात. हा रंग ज्यांना आवडतो ते अतिशय भावूक असतात. व्यक्तिगत आणि व्यावसायिक क्षेत्रात संतुलन बनवणे आवश्यक आहे. तसेच या आवडीच्या रंगाच्या लोकांना स्वतंत्र विचार असतात. 

6/7

पिवळा रंग

तुला पिवळा रंग आवडतो का? आपण एक आशावादी आणि आनंदी व्यक्ती आहात. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कठीण काळातही तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहतो. तुमचे स्मित आणि ऊर्जा लोकांना आकर्षित करते. ऑफिसमध्ये तुम्ही बॉसचे आवडते आहात.

7/7

काळा रंग

काळा रंग ज्या व्यक्तींना आवडचो त्यांचा निश्चय दृढ असतो व ते आत्मविश्वासू असतात. हे लोक कोणतंही संकट उचलण्यापासून घाबरत नाही. एकमेकांना सन्मान करणे हे त्यांना महत्त्वाचे वाटतात. हे लोक अतिशय स्वतंत्र आणि खुल्या विचारांचे असतात. यांच व्यक्तिमत्त्व नेतृत्व करणारं असतं. हे विद्रोही स्वभावाचे असतात.  ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )