1/5
सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

2/5
सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

पण, काळापूर्वी कार्यक्रमातील सहकलाकारांसोबत झालेल्या वादामुळे कपिलच्या करिअरमध्ये असं एक वळण आलं जे सर्व परिस्थितीला कलाटणी देऊन गेलं. सुनील ग्रोव्हरसोबत असणाऱ्या मतभेदांचा मुद्दा कलाविश्वाच्या वर्तुळात बराच चर्चेत राहिला. पण, त्या दोघांमध्ये नेमका काय वाद झाला होता, याची संपूर्ण माहिती कपिलकडूनही मिळाली नाही, किंवा सुनीलकडूनही.
3/5
सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

बऱ्याच अंशी या मुद्द्यावर मौन बाळगल्यानंतर आणि या संबंधांना सुधारण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलण्याच्या दृष्टीने निर्णय घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनीही वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याच वातावरणात आता खुद्द कपिल शर्मा यानेच अभिनेता अरबाज खान याच्या 'पिंच' या कार्यक्रमात खुलासा केला. सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी सांगत मी कधीच कोणाला चित्रीकरणासाठी वाट पाहायला लावली नव्हती असं त्याने स्पष्ट केलं.
4/5
सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

सुनील आणि आपल्यामध्ये मतभेट वाढण्यास इतर व्यक्ती जास्त कारणीभूत असल्याचं स्पष्ट करत अनेक अफवांना त्यांनीच हवा दिल्याचं कपिलने स्पष्ट केलं. 'कोणी म्हटलं मी कोणा एका सहकाऱ्यावर बूट भिरकावला, तर कोणी म्हटलं टीमने माझ्यापूर्वी जेवून घेतल्यामुळे मी रागावलो होतो.... माझा चेहरा पाहून तरी तुम्हाला असं खरंच वाटतं का?', असं म्हणत या सर्व चर्चा अफवा असल्याचं त्याने स्पष्ट केलं. सुनील किंवा आपण स्वत: कधीच याविषयी वक्तव्य केलं नसल्याचं म्हणत बाहेरच्या वक्तींनी परसवलेल्या या अफवांवरच बातम्या लिहिल्या गेल्याचम म्हणत कपिलने नाराजी व्यक्त केली.
5/5
सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा
