तुम्हालाही होतोय का Shift Shock चा त्रास? 70% हून अधिक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ग्रासलं
Corporate World Shift Shock Issue: तुम्ही कॉर्परेटमध्ये काम करता का? तुम्हालाही जगभरातील 70 टक्के कॉर्परेट कर्मचाऱ्यांप्रमाणे एक विशिष्ट समस्या जाणवते का? या समस्येला 'शिफ्ट शॉक' असं म्हणतात. मात्र ही समस्या नेमकी आहे का? ती कशामुळे उद्भवते? त्यावरील उपाय काय करता येतील? यासंदर्भातील A To Z माहिती जाणून घेऊयात...
Swapnil Ghangale
| Apr 18, 2024, 10:28 AM IST
1/10

तुम्ही नुकतेच नवीन ठिकाणी नोकरीला लागला आहात आणि पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला चूकल्यासारखं किंवा दिशाहीन झाल्यासारखं अथवा गोंधळून गेल्यासारखं वाटत आहे का? कोरोनाच्या लाटेनंतर कामाच्या ठिकाणी सातत्याने होणारे बदल आणि कामाची हायब्रिड पद्धत यामुळे कॉर्परेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांना 'शिफ्ट शॉक'चा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2/10

मागील काही वर्षांमध्ये 'शिफ्ट शॉक' या शब्दाचा कॉर्परेटमधील वापर वाढला आहे. असं असलं तरी हा शब्द जे काही सूचवतो त्या गोष्टींकडे सदर शब्द चर्चेत येण्याआधीपासूनच कामाच्या ठिकाणच्या अडचणी म्हणूनच पाहिलं जातं. मूस सर्वेक्षणामधील आकडेवारीनुसार, कॉर्परेटमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 70 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये कधी ना कधी 'शिफ्ट शॉक'चा त्रास जाणवला आहे.
3/10

2023 मधील कॉर्परेट क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेतील ट्रेण्ड्समध्ये 'शिफ्ट शॉक'चा समावेश होतो. युएस न्यूजनुसार यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये या 'शिफ्ट शॉक'बद्दलच्या अधिक चर्चा वरचेवर ऐकायला मिळतील. मूसने या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या 'शिफ्ट शॉक'संदर्भातील सर्वेक्षणामध्ये 29 टक्के कॉर्परेट कर्मचाऱ्यांनी आपल्याला कामाच्या ठिकाणी झालेले बदल आणि कंपनीमधील धोरणात्मक निर्णय तसेच वर्क कल्चरचा त्रास होतो असं नमूद केलं आहे.
4/10

'शिफ्ट शॉक'ला अगदी सोप्या भाषेत समजून सांगायचं झाल्यास ऑफिसमधील बदलांमुळे येणारं नैराश्य. मग हे बदल नोकरी बदलल्याने नवीन ऑफिसमध्ये जुळवून घेतानाचे असतील किंवा आहेत त्या ऑफिसमध्ये होणार धोरणात्मक बदल असतील. कामाच्या नवीन ठिकाणी किंवा आहे त्या ऑफिसमध्येच सातत्याने कार्यलयीन वातावरणात बदल होत असल्याने बसणारे आश्चर्याचे धक्के, त्यामधून येणारी निराशा, वाटणारा खेद यासारख्या गोष्टींना सर्व साधारणपणे 'शिफ्ट शॉक' असं म्हणता येईल.
5/10

'लिंक्डइन'च्या आकडेवारीनुसार सर्वसामान्यपणे कोणताही कर्मचारी 4.2 वर्षांनंतर नोकरी बदलोत. नवीन कंपनीमध्ये नव्या जबाबदारीसहीत एखादी व्यक्ती रुजू होते तेव्हा सुरुवातीचा काही काळ दिशाहीन झाल्यासारखं होतं. सध्याची जनरेशन झेड आणि मिनिमिलिस्टक जनरेशन कोणत्याही अनुभवाशिवाय नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार असते. अशा नोकऱ्यांना ते अगदी ड्रीम जॉबही म्हणतात.
6/10

अनेकदा अपेक्षित कामापेक्षा वेगळेच काम आपल्याला करावं लागत असल्याची भावनाही 'शिफ्ट शॉक'साठी करणीभूत ठरते. बऱ्याच ठिकाणी कंपन्यांनी दिलेली चुकीची माहिती, कंपनीच्या अपेक्षा आणि नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांमधील तफावत, कामासंदर्भातील तडजोडी, कंपनीतील कामाची पद्धत, अपेक्षित सकारात्मक बाबींबद्दल हाती आलेली निराशा, कुरघोडीचं राजकारण असलेलं कार्यालयीन वातावरण यासारख्या गोष्टींमुळे अनेकांना 'शिफ्ट शॉक'चा त्रास होतो.
7/10

8/10

9/10
