असं झाल तरी काय? दोन्ही राजे थेट समोरासमोर भिडले; अख्खं सातार या राजांचा वाद पाहायला जमलं

साता-यात भाजप खासदार उदयराजे भोसले आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा आमनेसामने आले. निमित्त ठरलं ते सातारा कृषी उत्पन्न समितीच्या नवीन होणा-या मार्केटचं. साता-यात खिंडवाडी बाजार समितीच्या भूमिपुजन कार्यक्रमात दोन राजेंमधला वाद विकोपाला गेला. खासदार उदयनराजेंनी शिंवेंद्रराजेंचा कार्यक्रम उधळून लावला. 

Jun 21, 2023, 23:50 PM IST

Udayanraje Bhosale vs Shivendra Raje Bhosale : साता-यात भाजप खासदार उदयराजे भोसले आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा आमनेसामने आले. निमित्त ठरलं ते सातारा कृषी उत्पन्न समितीच्या नवीन होणा-या मार्केटचं. साता-यात खिंडवाडी बाजार समितीच्या भूमिपुजन कार्यक्रमात दोन राजेंमधला वाद विकोपाला गेला. खासदार उदयनराजेंनी शिंवेंद्रराजेंचा कार्यक्रम उधळून लावला. 

1/8

साता-यात दोन्ही राजेंमधला वाद पुन्हा उफाळून आलाय. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आज या जागेचं भूमिपूजन होणार होतं. मात्र त्याआधीच उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले, आणि त्याठिकाणचं साहित्य फेकून दिलं.

2/8

पोलिसांसमोरच दोन्ही राजे आमनेसामने आले होते. 

3/8

शासनानं ही जागा आरक्षित करुन सातारा कृषी उत्पन्न समितीला दिल्याचा दावा शिवेंद्रराजेंनी केला.

4/8

उदयनराजे पोहचलेले समजताच शिवेंद्रराजेही आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचले.

5/8

शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनाही तिथून हुसकावून लावले. 

6/8

ही जागा माझ्या मालकीची आहे असा दावा करत त्यांनी जागेवरचे लोखंडी कंटेनर पोकलेनच्या साहाय्यानं उखाडून टाकले. 

7/8

भूमीपूजन आधीच उदयनराजे भोसले त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोहचले. 

8/8

सातारच्या खिंडवाडीमध्ये साडे पंधरा एकर प्रशस्त जागेत सातारा कृषी उत्पन्न समिती होणार आहे. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शिवेंद्रराजेंच्या हस्ते होणार होता.