ओडिशा रेल्वे अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू, 350 जखमी... अपघाताचे थरकाप उडवणारे फोटो

Coromandel Express Accident: ओडिशात बालासोर (Balasore) इथं एक्स्प्रेसचा (Coromandel Express) भीषण अपघात झालाय. या अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली आणि हा अपघात घडला.. बहानागा स्टेशनजवळ (Bahanaga Station) हा भीषण अपघात झाला. 350 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. हा अपघात इतका भीषण होता की कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे मालगाडीच्या डब्यांवर चढले होते. या अपघाताचे भयानक फोटो समोर आले आहेत. 

राजीव कासले | Jun 02, 2023, 23:18 PM IST
1/5

ओडिशातल्या बालासोरमधल्या बहानागा स्टेशनजवळ एक्स्प्रेस आणि मालगाडी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तर 350 प्रवासी जखमी झाले असन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

2/5

रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना 10 लाख रुपये देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून गंभीर जखमींना 2 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. हा अपघात इतका भीषण होता की कोरोमंडल एक्सप्रेस (12841) चे काही डबे रुळावरुन खाली घसरले. तर प्रवाशांनी भरलेले काही डबे पलटी झालेत.

3/5

स्थानिक प्रशासनाबरोबरच एनडीआरएफच्या पाच टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 50 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. पण जखमीची संख्या जास्त असल्याने रुग्णालयात नेण्यासाठी काही बसेसही सेवेत देण्यात आल्या आहेत. 

4/5

अपघााताचं गांभीर्य लक्षात घेता इंडियन एअरफोर्सचीही मदत घेण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे तातडीने ओडिशासाठी रवाना झाले आहेत. राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रेल्वे अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत झालेल्या प्रवाशांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

5/5

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन ट्रेनचा समावेश आहे. आधी एक एक्स्प्रेस आणि मालगाडीत धडक झाली त्यानंतर मागून आलेली कोरोमंडल एक्स्प्रेस या दोन गाड्यांना धडकली. त्यामुळे या अपघाताची व्याप्ती मोठी आहे.