कोरोनाची दहशत... विमानतळांवर घेण्यात येतेय विशेष खबरदारी

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं आहे.  

Mar 10, 2020, 12:07 PM IST

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक विमानतळांवर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. संपूर्ण विमानतळावर किटकनाशक फावारणी करण्यात येत आहे. शिवाय कोरोनापासून वाचण्यासाठी विशेष गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन दिल्ली विमानतळाकडून करण्यात आलं आहे. 

1/4

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी दिल्लीच्या विमानतळावर किटकनाशक फवारणी करण्यात आली.   

2/4

चीन हा उगमस्थान असलेला कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात १ लाख १४ हजार ४३५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.   

3/4

जवळपास ४ हजार २७ रुग्ण या व्हायरसमुळे बळी गेले आहेत. तर ६४ हजार ९९ लोकांची या व्हायरसपासून सुटका झाली आहे.   

4/4

महाराष्ट्रात देखील कोरोना दाखल झाला आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण अढळले आहेत.