केस कापण्यासाठी 1 लाख रुपये खर्च, शमीचा 'किलर लूक' पाहिलात का?

Mohammad Shami Comeback : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याआधी त्याचा नवा लूक समोर आला आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिश आलिम हकीमकडे मोहम्मद शमीने हेअर कट केला आहे. 

राजीव कासले | Aug 23, 2024, 21:13 PM IST
1/8

केस कापण्यासाठी 1 लाख रुपये खर्च, शमीचा 'किलर लूक' पाहिलात का?

2/8

टीम इंडियााचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बराच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर शमी मैदानावरच उतरलेला नाही. आता शमी पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. 

3/8

कमबॅक करण्याआधी मोहम्मद शमी नव्या लूकमध्ये दिसलाय.  प्रसिद्ध हेअर स्टायलिश आलिम हकीमकडे मोहम्मद शमीने हेअर कट केला आहे.   

4/8

मोहम्मद शमीआधी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनीही आलिम हकिमकडे हेअर कट केलेला आहे. एका रिपोर्टनुसार आलिम हकिम एका सेशनचे जवळपाच 1 लाक रुपये घेतो. 

5/8

मोहम्मद शमीने हेअर कट केल्यानंतर नवा लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 

6/8

शमीने फोटो शेअर करत त्याला एक कॅप्शनही दिला आहे. त्यात त्याने म्हटलंय 'न्यू लूक सेम हसल'  आतापर्यंत या फोटोला 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

7/8

एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातून शमी सध्या सावरत असून त्याने नेटमध्ये सरावही सुरु केला आहे. 

8/8

शमी, धोनी आणि विराटबरोबरच युवराज सिंह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी, रणवीर सिंह, विक्की कौशल हे सुद्धा आलिम हकीमध्ये हेअरकट करतात.