Year Ender 2023: टीम इंडियासाठी सरतं वर्ष ठरलं लग्नाचं, तब्बल 7 खेळाडूंनी बांधली लग्नगाठ

Indian Cricketer Married In 2023: क्रिकेटच्या दृष्टीने 2023 हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं. या वर्षात भारतात एकदिवसीय विश्चषका स्पर्धा पार पडली. टीम इंडियाला जेतेपद पटकावता आलं नाही, पण टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त झाली. यादरम्यान टीम इंडियाच्या तब्बल सात खेळाडूंनी लग्नगाठ बांधली.

राजीव कासले | Dec 11, 2023, 21:47 PM IST
1/7

2023 या वर्षात टीम इंडियाचे तब्बल सात खेळाडू लग्नाच्या बंधनात अडकले. सर्वात ताजं लग्न म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचं. 28 नोव्हेंबरला मुकेश कुमारने दिव्या सिंहशी लग्न केलं.

2/7

भारताचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज केएल राहुलने 23 जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्नगाठ बांधली. अथिया अभिनेता सुनील शेट्टीच मुलगी आहे.   

3/7

भारताचा स्टार ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरने 27 फेब्रुवारीला मिताली पारुलकरबरोबर विवाह केला. 2021 मध्ये त्याने साखरपुडा केला होता. 

4/7

भारतीय क्रिकेट संघाचा उगवता तारा ऋतुराज गायकवाडचा विवाह देखील याच वर्षात पार पडला. 3 जानेवारीला त्याने उत्कर्षा पवारबरोबर सात फेरे घेतले. उत्कर्षा ही महाराष्ट क्रिकेट संघाची खेळाडू आहे.   

5/7

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने  जूनला लग्न केलं. रचना असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. दुखापतीमुळे प्रसिद्ध बराच काळ संघाबाहेर होता. यादरम्यानच त्याने लग्न केलं. 

6/7

गेला अनेक भारतीय संघातून बाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने 24 नोव्हेंबरला लग्न केलं. त्याने गर्लफ्रेंड स्वाती अस्थानाबरोबर सात फेरे घेतले. 

7/7

क्रिकेटच्या तीन फॉर्मेटमध्ये खेळणारा टीम इंडियाच स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलने गर्लफ्रेंड मेहा पटेलबरोबर 27 जानेवारीला लग्नगाठ बांधली, गुजरातमधल्या वडोदरामध्ये शानदार विवाहसोहळा पार पडला