Cyber Fraud! तुमच्या मोबाईलवर 'या' 7 ऑफर आल्या तर क्लिक करु नका, अन्यथा बँक अकाऊंट होईल रिकामं
Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारी मोठ्याप्रमाणावर वाढत चालली आहे. सध्याच्या युगात मोबाईल (Mobile) ही दैनंदिन गरज बनली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. शॉपिंग असो की बँकेची कामं मोबाईलद्वारेच केली जातात. पण ज्या प्रमाणात मोबाईलचा वापर वाढला आहे, त्याच प्रमाणात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) देखील वाढली आहे. गेल्या एका वर्षात https://cybercrime.gov.in/ या साईटवर तब्बल 20 लाख लोकांनी तक्रार नोंदवलीय. यात 40 हजार तक्रार एफआयआर (FIR) रजिस्टर करण्यात आल्यात. मोबाईलवर आपल्याला काही ऑफर्स (Offers) येतात, या ऑफर्सना आपण भुलतो आणि इथेच फसतो.
मूव्ही रेटिंगची ऑफर

काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या एका महिलेला एक मेसेज आला. घरी बसल्या मोबाईलवर चित्रपटांना रेटिंग देण्याचं काम करुन पैसे कमवू शकता असा हा मेसेज होता. ही ऑफर महिलेला आवडली तीने मेसेजला रिप्लाय केला. यानंतर तिला एक लिंक पाठवण्यात आली. यावर तिला 30 वेळा क्लिक करण्यास सांगण्यात आलं. पैसे मिळतील या अपेक्षेने महिलेने तीस वेळा लिंकवर क्लिक केल, पण तिला पैसे मिळण्याऐवजी तिच्याच अकाऊंटमधून 12 लाख रुपये काढण्यात आले.
क्रेडिट कार्ड रिवॉर्ड प्वाइंट

प्रदीप नावाच्या एका व्यक्तीला अज्ञात नंबरवरुन एक फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने आपण बँकेचे अधिकारी असल्याचं सांगितलं. तुम्ही वापरत असलेल्या क्रेडीट कार्डवर रिवार्ड पॉइंट्स आहेत, ते तुम्ही वापरले नाही तर बाद होतील असं त्या महिलेने प्रदीप यांना सांगितलं. त्यानंतर प्रदीप यांना एक लिंक पाठवण्यात आली. रिवार्ड पॉइंट्स मिळवण्याचा नादात प्रदीप यांनी त्यावर क्लिक केली आणि स्वत:चे डिटेल टाकून लिंक सेंड केली. याबरोबरच प्रदीप यांच्या खात्यातून 22,341 रुपये कट झाले.
विजेचं बिल थकलंय

तुमंच विजेचं बिल थकलं आहे, या तारखेपर्यंत बिल न भरल्यास वीज खंडीत केली जाईल असे मेसेज सध्या अनेकांनी येत आहेत. याच मेसेजमुळे एका व्यक्तीला तब्बल 25 लाख रुपये गमवावे लागले. पूरन जोशी यांना वीज थकीत बिलाचा मेसेज आला. बिल न भरल्यास रात्री 9 वाजेपर्यंत वीज कापण्याचा इशारा त्यात देण्यात आला. आलेल्या मेसेजवर पूरन जोशी यांनी फोन केला. त्यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आलं आणि त्यात सर्व डिटेल्स टाकण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांचा फोन हॅक झाला आणि अकाऊंटमधून 27 लाख रुपये गायब झाले.
एटीएम ब्लॉक

एटीएमद्वारे फसवणूकीचे तर अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेशमधल्या सागर नावाच्या एका तरुणाचं एटीएम कार्ड एटीएम मशिनमध्ये अडकलं. त्याने तिथे दिलेल्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केला. कार्ड मशिनमध्येच सोडण्याचं सागरला सांगण्यात आलं. सागर कार्ड तिथेच सोडून निघाला असता त्याच्या खात्यातून 51 हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज त्याला आला. वास्तविक एटीएममध्ये आरोपींनी कस्टमर केअर नंबरऐवजी स्वत:चा नंबर लिहिला होता.
वर्क फ्रॉम होम जॉब

कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. कोरोना कमी झाल्यानंतर कंपन्या सुरु झाल्या पण वर्क फ्रॉमची सवय लागलेले अनेक कर्चमारी कामावर गेलेच नाहीत. याचा फायदा घेत वर्क फ्रॉम होम काम देणाऱ्या अनेक फर्जी कंपन्या सुरु झाल्या. एका महिलेने इंटरनेटवर सर्च करुन एका कंपनीशी संपर्क साधला. घरबसल्या महिना वीस हजार रुपये कमवण्याची तिला ऑफर देण्यात आली. यासाठी तिला एक लिंक शेअर करण्यात आली. पण जेव्हा या महिलेने लिंकवर केले तेव्हा तिच्याच अकाऊंटमधून 64 हजार रुपये गेले.
पेटीएमद्वारे फ्रॉड

रुपेश नावाच्या एका व्यक्तीने OLX वर वॉशिंग मशिन विकण्याची जाहीरात टाकली. समोरुन त्याला ग्राहकाचा त्याला फोन आला. त्याने वॉशिंग मशिन विकत घेण्याची इच्छा दाखवली. यासाठी त्याने रुपेश यांच्या अकाऊंटला सुरुवातील दोन रुपये पाठवले. रुपेश यांना त्या ग्राहकाबद्दल खात्री पटली. त्यानंतर त्या ग्राहकाने रुपेश यांना एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक केल्यास उर्वरित पैसे तुमच्या अकाऊंटला जमा होतील असं सांगण्यात आलं. रुपेशने दिलेल्या लिंकवर क्लिक केलं, पण त्यांच्याच अकाऊंटमधून 21 हजार रुपये काढण्यात आले.
न्यूड व्हाट्सऐप कॉल
