चावला तर हाडांचा चुरा होईल! ब्रिटनमध्ये 'या' श्वानावर बंदी, पाहा किती आहे धोकादायक
American Bully Dogs are Banned In Britain: ब्रिटनच्या बर्मिंगहॅममध्ये एका 11 वर्षांच्या मुलीवर अमेरिकन बुली डॉग जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. या मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या इतर दोन माणसांनाही त्याने सोडलं नाही. कुत्र्याच्या हल्ल्यात तिघंही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर American Bully Dogs वर बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला. यादरम्यानच हा कुत्रा चावल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी आपातकालिन बैठक बोलावत या जातीच्या कुत्र्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.






