4112 कोटींची मालकीण म्हणते, "मी सेलिब्रिटींना डेट केलं, प्रायव्हेट जेट चालवते, बॉयफ्रेण्डने स्वत:ला संपवलं अन्..."

4112 Crore Owner 32 Year Old Says I am Struggling Entrepreneur: पैसा म्हणजे सुख समृद्धी असा एक समज आहे. मात्र अनेक अब्जाधिशांच्या आयुष्यामध्येही वेगळी दु:ख असतात असं सांगितल्यास अनेकांना विश्वास बसत नाही. असेच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. ही तरुणी कोट्यधीश आहे. तिच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. तिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. मात्र असं असतानाही ती समाधानी नाही. तिनेच हा धक्कादायक खुलासा केला आहे. कोण आहे ही तरुणी आणि तिची काय समस्या आहे जाणून घेऊयात...

| Jul 28, 2023, 09:52 AM IST
1/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

जे आयुष्य मी जगत आहे त्याबद्दल तुम्ही जवळून जाणून घेतलं तर तुम्हाला या लाइफस्टाइलचा द्वेष वाटेल असंही या अमेरिकन उद्योजिकेने म्हटलं आहे. या उद्योजिकेचं नाव आहे जेसिका माह!  

2/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

जेसिका माह ही स्टार्टअपची संस्थापक तसेच व्हेंचर कॅपिटलिस्ट आहे. ती अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. ती जगभरातील वेगवेगळ्या लोकेशनवरुन स्वत:चे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

जेसिका माहकडे आलिशान गाड्यांचा ताफाच आहे. वयाच्या 32 व्या वर्षी तिच्याकडे तिचं स्वत:चं खासगी जेट विमान आहे.

4/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

माझं आयुष्य अनेकांना स्वप्नवत वाटत असलं तरी ते तसं नसल्याचं जेसिका माह तिच्यासारखं आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्यांना सांगिते. 

5/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

आधी जेसिका माह कोण आहे हे जाणून घेऊयात. शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाच कोट्यधीश झालेल्या काही मोजक्या यशस्वी तरुणांमध्ये जेसिकाचा समावेश होतो. शाळेत शिकत असतानाच जेसिकाने आपला व्यवसाय सुरु केला.

6/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

जेसिका माहने एक फिटनेस कंपनी स्थापन केली आणि अल्पावधीतच ही कंपनी प्रसिद्ध झाली. काही महिन्यांमध्येच अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांशी जेसिका माहची कंपनी स्पर्धा करु लागली. जगभरातील महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी जेसिका माह प्रेरणास्थान ठरत आहे. आज जेसिकाच्या कंपनीचं मुल्य 500 मिलिअन अमेरिकी डॉलर्स इतकं आहे. भारतीय चलनामध्ये ही रक्कम 4112 कोटींहून अधिक आहे.

7/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

जेसिका माह ही शाही थाटात आयुष्य जगत आहे. तिचे फोटो पाहूनही अनेकांचं असं म्हणणं आहे. मात्र जेसिका माहने केलेल्या एका पोस्टमध्ये स्वत:च्या आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

8/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

मी अनेक प्रसिद्ध लोकांना डेट केलं आहे. प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेजवर मी झळकले आहे. खासगी विमान उडवलं आहे. आलिशान गाड्या चालवल्या आहेत. माझं आयुष्य एखाद्या स्वप्नासारखं असल्याचं जगाला वाटतं पण तसं नाहीय, असं जेसिका माह या पोस्टमध्ये सांगते. 

9/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

लिंक्डइनवरील पोस्टमध्ये जेसिका माहने, "जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एक उद्योजिका म्हणून जागोजागी फिरायचे. तेव्हा अनेक विद्यार्थी मला, आम्हाला तुमच्यासारखं आयुष्य हवं आहे असं सांगतात. मात्र माझे मित्र व निकटवर्तीय अनेकदा म्हणतात की माझ्यासारखं आयुष्य जगावं लागलं तर त्यांना त्याचा द्वेष वाटेल. मी दर आठवड्याला जवळजवळ 60 तास न थकता काम करते," असं म्हटलं आहे.

10/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

मला अकम्पिशमेंट डिस्मॉर्फियाची समस्या असल्याचं जेसिका माहने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

11/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

मला यशस्वी लोकांमध्ये राहायला फार आवडतं. या लोकांकडून फार काही शिकायला मिळतं. त्यामुळेच मी अजूनही स्वत:ला संघर्ष करत असलेली उद्योजिकाच समजते असं जेसिका माहने म्हटलं आहे.

12/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

माझ्या प्रियकराने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली आहे असंही जेसिका माहने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. बॉयफ्रेण्डने आत्महत्या केल्याने मी फार तणावामध्ये होते, असं तिने म्हटलं आहे.

13/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

तसेच बॉयफ्रेण्डच्या आत्महत्येमुळे जेसिका माह इतकी घाबरली होती की तिला डेट करण्याचा विचार करुनही भिती वाटू लागली.

14/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

"मला यशस्वी लोकांशी स्वत:ची तुलना करायला आवडतं. मात्र यामुळे तुम्हाला त्रासाशिवाय इतर काहीही मिळत नाही," असं जेसिका माह सांगते.

15/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

जेसिका माहच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी तिने हे विचार स्पष्टपणे मांडल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे. 

16/16

jessica mah says I am struggling entrepreneur viral post

काहींनी जेसिका माह तिच्या लाइफस्टाइलमुळे गुदमरल्यासारखी झाली असून तिला आयुष्याचा आनंद घेता येत नसल्याचं म्हटलं आहे.