सावधान! Depressionचा शरीरावरही गंभीर परिणाम

नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. अमेरिकन सायकॅट्रीक असोसिएशनच्या मते, नैराश्य (Depression) हा एक सामान्य पण गंभीर आजार आहे. जो आपल्या विचारांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आपल्याला कसे वाटते आणि त्यानुसार आपण कसे वागतो या सर्वाचा नकारात्मक परिणाम होतो.

Feb 25, 2021, 19:02 PM IST
1/5

डिप्रेशनचा (Depression) चा शरीरावर होणारा परिणाम

डिप्रेशनचा (Depression) चा शरीरावर होणारा परिणाम

नैराश्येतून आपल्याला खूप उदास किंवा दु:खी असल्यासारखं वाटतं. अभ्यासातून आणि अहवालातून दिलेल्या माहितीनुसार नैराश्य आल्यानंतर त्याच्या परिणाम मनावर होतो. पर्यायानं शरीरावरही ते दिसून येतात. जर कोणती व्यक्ती डिप्रेशनमधून जात असेल तर त्यांचा परिणाम मनावर आणि भावनांवर होत नाही तेवढा शरीरावर होतो. यात शरीराच्या काही भागामध्ये होणारा त्रास, वजनामध्ये होणारा बदल इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यानुसार दर ६ महिलांमधील १ महिलेला आणि दर ८ पुरूषांमधील एक पुरूष नैराश्येनं ग्रासलेला असतो.

2/5

पाठदुखी आणि स्नायू दुखणे

पाठदुखी आणि स्नायू दुखणे

जर आपल्याला सकाळी ठीक वाटत असेल पण ऑफिसमध्ये डेस्कवर बसल्यानंतर आपली पाठ आणि कंबरदुखणे सुरू झाले तर ते आपण चुकीच्या बसण्या सवयीमुळे किंवा कोणत्याही प्रकाराच्या दुखापतीमुळे होऊ शकते हेही कारण आहे परंतु हे ताण (stress) किंवा  नैराश्य आल्यानं (Depression) हे होऊ शकतं. २०१७ साली  कॅनेडियन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एक अभ्यास केला ज्यामध्ये त्यांना पाठदुखी आणि डिप्रेशनचा थेट संबंध आढळला. या अभ्यासामध्ये असे म्हटले गेले आहे की शरीरात होणारी वेदना आणि जळजळ मेंदूत उपस्थित असलेल्या न्यूरोसर्किट्सशी संबंधित आहे.

3/5

डिप्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते

डिप्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते

डोकेदुखी ही समस्या आपण इतकी सामान्य समजतो की त्याचा उपचारदेखील करत नाही. काही ताण-तणावामुळे किंवा वादामुळे पण काहीवेळा डोकेदुखी होते. पण आपली डोकेदुखी ही कायम  ताणामुळे (stress) होईल गरजेचं नाही. हे नैराश्येचं लक्षण देखील असू शकते. अश्याप्रकाराची डोकेदुखी ही मायग्रेन इतकी गंभीर नसते. अमेरिकेच्या नॅशनल हेडएक फाउंडेशनच्यानुसार या प्रकाराच्या डोकेदुखीला टेंशन हेडएक (Tension headache) असे म्हणतात.  ज्यामध्ये डोक्यात खळबळ असते, विशेषत: ती भुवयाभोवती असते. डोकेदुखी हे डिप्रेशनचे लक्षण नाही पण आलेला ताण आणि चिडचिडेपणामुळे हा त्रास होत असतो.

4/5

पोटदुखी किंवा अस्वस्थ वाटणे

पोटदुखी किंवा अस्वस्थ वाटणे

जर कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला तणाव वाटत असेल तर त्याचवेळेस पोटामध्ये जास्त दुखणे हे नैराश्येमध्ये असल्याचा एक संकेत आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनात असे दिसून आले आहे की,  पोटात गोळा  येणे, पोट फुगणे आणि मळमळ यासारख्या पोटातील समस्या खराब मानसिक आरोग्याची लक्षणे आहेत. हार्वर्डमधील संशोधकांच्या मते, डिप्रेशनमुळे पाचन संस्थेमध्ये जळजळ होते आणि लोक वारंवार ओटीपोटात होणारी वेदना इरिटेबल बाऊल सिंड्रोम मानतात. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, आतड्याचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांच्यात एक संबंध आहे.

5/5

जास्त थकवा येणे

जास्त थकवा येणे

थकवा हे सुद्धा नैराश्यामध्ये असल्याचं सामान्य लक्षण आहे. तसं तर काहीवेळा जास्त काम किंवा एखाद्या प्रकारच्या तणावामुळे अतिथकवा जाणवतो. पण डिप्रेशनमुळे थकवा देखील येऊ शकतो. अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील क्लिनिकल रिसर्च प्रोग्रामचे संचालक डॉ. मौरिजिओ फावा म्हणतात की, डिप्रेशनने ग्रस्त झालेले लोक नीट झोपत नाहीत आणि यामुळेच त्यांना रात्रभर विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत राहतो. थकव्यासह, जर एखाद्या व्यक्तीला झोप पूर्ण होऊन देखील थकल्यासारखं वाटत असेल किंवा निराश वाटत असेल तर ते देखील एक लक्षण असू शकतं.