'कान' फेस्टिवलमध्ये 'ही' अभिनेत्री दीपिका-प्रियंकापेक्षा पुढे...
सध्या 'कान फिल्म फेस्टिवल'च्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या चर्चातर वाऱ्यासारख्या पसरतच आहेत.
मुंबई : सध्या 'कान फिल्म फेस्टिवल'च्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या चर्चातर वाऱ्यासारख्या पसरतच आहेत. कोणत्या अभिनेत्रीने किती हटके लूकचे कपडे घातले आहेत, कोणावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत, यामध्ये जणू स्पर्धाच रंगली आहे. दीपिका आणि प्रियंका या दोन अभिनेत्रींनी स्वत:च्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पण कानमध्ये एका अभिनेत्रीने या हरहुन्नरी अभिनेत्रींना सुद्धा मागे टाकले आहे. अभिनेत्री डायना पेंटीने तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केले आहे.


