हे तुम्हाला माहित आहे का? टाटा, अंबानी आणि देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात?
रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह देशातील बड्या कंपन्यांची उलाढाल ही कोट्यावधीची आहे. या कंपन्यांकडून टॅक्सच्या रुपात भरताच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होते.
ITR Filling: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपली आहे. आयकर रिटर्न भरण्याची मुदत संपल्यामुळे कर दात्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दंडाची रक्कम भरुन आयकर रिटर्न भरावा लागणार आहे. भारतातील प्रत्येक करदात्याला तसेच कंपन्यांना आयकर रिटर्न भरावा लागतो. रतन टाटा, मुकेश अंबानी या प्रसिद्ध उद्योगपतींसह बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात? जाणून घ्या.


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा स्टील यांची कोट्यावधींची उलाढाल आहे. Cleartax अहवालानुसार, TCS ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 11,536 कोटी रुपयांचा कर भरला होता. हा कर कंपनीच्या एकूण महसुलाच्या 6.8 टक्के इतका आहे. टाटा स्टील आपल्या उलाढालीच्या 8.4 टक्के कर सरकारला देते. हा कराचा आकडा 11,079 कोटी रुपये इतका आहे.




ITC लिमिटेड ही भारतातील सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1910 मध्ये झाली. याचे हेड ऑफिस कोलकाता येथे आहे. कंपनी अन्न, सिगारेट आणि सिगार, कागद, वैयक्तिक काळजी आणि स्टेशनरी यांसारखी उत्पादने तयार करते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, ITC ने 4,771 कोटी रुपयांचा कर भरला होता, जो महसुलाच्या 7.6 टक्के आहे.
