तुम्हीही नवीन कपडे न धुता घातला का? मग सावधान…वाचा याचे दुष्परिणाम

New clothes without washing : नवीन कपडे घालायला सर्वांना आवडतात पण हेच नवीन कपडे तुम्हाला आजारी पाडू शकता. बहुतेक वेळा, लोक नवीन कपडे घरात आणल्याबरोबर ते तसेच घालायला सुरुवात करतात, परंतु असे करणे किती घातक ठरु शकते ते जाणून घ्या.. 

Jun 15, 2023, 17:15 PM IST
1/8

अनेकांना ऑनलाइन कपडे ऑर्डर करण्याची सवय असते, मात्र ट्राय केल्यानंतर फिटिंगला योग्य नसल्यास ते परत करतात आणि पुन्हा दुसरे मागवतात.  त्याचप्रमाणे लोक ट्रायल रूममध्ये कपडे घालतात आणि त्यांना ते आवडत नसल्यास ते तिथेच सोडून देतात. 

2/8

हेच ट्राय केलेल कपडे पुन्हा रॅकमध्ये ठेवले जातात, जे कोणीतरी विकत घेतात आणि घालतात. कधीकधी असे कपडे परिधान केल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. 

3/8

शोरूमची ट्रायल रूमही जीवाणू पसरवण्यास कारणीभूत आहे. जर कोणी मॉल किंवा शोरूममध्ये कपडे खरेदी करायला गेले तर सर्वप्रथम ट्रायल रूममध्ये जाऊन फिटिंग तपासतो. कपडे अनफिट झाल्यावर ते तिथेच सोडून देतात. 

4/8

पण त्या व्यक्तीचा घाम किंवा घाण त्याच कपड्यांवर चिकटते. यानंतर हे कापड दुमदुन रॅकमध्ये ठेवले जाते. मग कोणीतरी ते घेते आणि न धुता घालू लागतात. त्या गोंधळाचा परिणाम त्या व्यक्तीच्या त्वचेवर होतो असे तज्ञांच्या मते, हे फार क्वचितच घडतात.

5/8

लोक ऑनलाइन कपडे ऑर्डर करतात असे अनेकवेळा दिसून आले आहे. कपडे घालून पाहिल्यानंतर अयोग्य फिटिंगमुळे कपडे परत केले जातात. त्यामुळे त्या व्यक्तीचा घाम, घाण त्या कपड्याला लागते.

6/8

जेव्हा दुसरी व्यक्ती तेच कपडे परिधान करते तेव्हा त्या कपड्याचा परिणाम त्याच्या त्वचेवर होऊ शकतो. हे व्हायरस किंवा बॅक्टेरिया आहेत जे उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत नवीन कपडे धुतल्यानंतर परिधान करणे आवश्यक आहे.

7/8

तज्ञांच्या मते, बहुतेक कंपन्या कपड्यांवरील डाग, रंग, मऊ आणि सुरकुत्या काढण्यासाठी विविध रसायनांचा वापर करतात. जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. कंपन्या या रसायनाबाबत फारशी माहिती देत नसल्या तरी फॉर्मल्डिहाइडसारखे रसायने प्रमाणापेक्षा जास्त मिसळणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.  

8/8

नवीन कपड्यांचा धोका लहान मुले आणि गर्भवती महिलांना अधिक असतो. लहान मुलांना मोलस्कम कॉन्टॅगिओसम सारख्या विषाणूजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो. यासोबतच गर्भवती महिलांची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत असते, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणूनच नवीन कपडे नेहमी धुवून परिधान केले पाहिजेत.