भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने घातलं 70000000 रुपयांचा घड्याळ, पाकिस्तानी खेळाडू पाहताच बसले

Champions Trophy 2025 : रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाचवा सामना भारत - पाकिस्तान यांच्यात पार पडला. यात भारताकडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला तर स्पर्धेतील सलग दुसरा सामना टीम इंडियाने 6 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चा ही हार्दिकच्या महागड्या घड्याळाची होतं आहे. 

Feb 24, 2025, 15:31 PM IST
1/7

भारत - पाक सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. त्यानंतर पाक फलंदाज बाबर आझम आणि इमाम उल हक यांची जोडी मैदानात स्थिरस्थावर असताना भारताचा गोलंदाज हार्दिक पंड्याने पाकच्या बॅटिंग लाईनअपला खिंडार पाडलं. त्याने आठव्या ओव्हरला बाबर आझमची विकेट घेऊन पाकिस्तानला धक्का दिला.  तर दुसरी विकेट त्याने सौद शकील याची घेतली.   

2/7

बाबरच्या विकेटनंतर हार्दिकने त्याला 'बाय बाय' करत सेंडऑफ दिला. यावेळी सर्वांच्या नजरा या हार्दिकने मनगटावर बांधलेल्या महागड्या घड्याळाकडे गेल्या. सध्या हार्दिकच्या या आलिशान महागड्या घड्याळाची चर्चा सोशल मीडियावर होतं आहे.

3/7

भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या याला महागड्या गोष्टींचा शौक आहे. लग्झरी लाईफस्टाईल आणि बिंदास आयुष्य जगणाऱ्या हार्दिककडे अनेक महागड्या घडाळ्यांचे कलेक्शन आहे. 

4/7

भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने रिचर्ड मिल RM27-02 CA FQ टूरबिलन राफेल नडाल स्केलेटन डायल एडिशन हे घड्याळ घातले होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या कलेक्शनची केवळ 50 घड्याळ बनवण्यात आली होती. या घड्याळाला मुळात टेनिसचा दिग्गज खेळाडू  राफेल नडाल याच्यासाठी बनवण्यात आले होते. 

5/7

रिचर्ड मिल आरएम 027 हे जगातील सर्वात हलक्या घड्याळांपैकी एक आहे.ज्याचं वजन स्ट्रॅप सहित 20 ग्रामपेक्षा थोडं कमी होतं. घड्याळाची किंमत जवळपास सात कोटी रुपये आहे. आरएम 27-02  घड्याळ ग्रेड 5 टाइटेनियम पुलने बनवण्यात आलं असून जे 70 तास पॉवर रिझर्व्ह करते.   

6/7

घड्याळातील क्वार्ट्ज टीपीटी केस त्याला एक फॅशन स्टेटमेंट देत. यापूर्वी देखील हार्दिक पंड्या आयपीएल दरम्यान हेच घड्याळ घालून मैदानात खेळण्यासाठी आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घडाळ्याची किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे.   

7/7

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 6 विकेट्स राखून पूर्ण केले. यावेळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे 51 वे शतक ठोकले.