'तंजावर मराठी' महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात बोलली जाते; शिवरायांसोबत खास कनेक्शन

महाराष्ट्राची मराठी ही राज्यभाषा आहे. आपल्या राज्यातीलच विविध जिल्ह्यात मराठीचा लहेजा बदलत असतो. पण तुम्हाला माहितीये का महाराष्ट्राच्या बाहेर एक वेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते. त्याबद्दल जाणून घेऊया. 

Mansi kshirsagar | Feb 24, 2025, 14:44 PM IST

महाराष्ट्राची मराठी ही राज्यभाषा आहे. आपल्या राज्यातीलच विविध जिल्ह्यात मराठीचा लहेजा बदलत असतो. पण तुम्हाला माहितीये का महाराष्ट्राच्या बाहेर एक वेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते. त्याबद्दल जाणून घेऊया. 

1/7

'तंजावर मराठी' महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात बोलली जाते; शिवरायांसोबत खास कनेक्शन

Vyankoji Bhosale was the founder of the dynasty. Thanjavur Maratha kingdom

महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी संस्कृती जपली जातेय. मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील बडोदा येथे मराठी राज्यकर्त्यांनी राज्य केले.  तसंच, तंजावर येथेही मराठ्यांनी राज्य केले त्यामुळं तिथे तंजावर मराठी बोलली जाते. कुठे आहे हे तंजावर?

2/7

 तंजावर हे तामिळनाडू राज्यातील एक जिल्हा आहे. कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर हे वसलेले आहे. तंजावरमध्ये मराठ्यांच्या राजवटीच्या व इतिहासाच्या खुणा दिसतात. 

3/7

शहाजीराजे यांचे धाकटे पुत्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांनी तंजावरचा प्रदेश जिंकला होता. व्यंकोजीराजे हे तंजावरचे पहिले राजे होते. 

4/7

तंजावर राज्य जिंकल्यानंतर व्यंकोजीराजे यांनी महाराष्ट्रातील जनतेला तंजावर येथे येण्याचे अवाहन केले होते. तेव्हा जवळपास पाच लाख मराठ्यांनी तंजावरमध्ये स्थलांतर केले होते. 

5/7

 तंजावरचे राजे मराठीभाषिक असल्याने तेथील मराठी भाषेला तामिळ भाषेची जोड मिळाली. त्यामुळं ती भाषा थोडी वेगळी असते. याच भाषेला तंजावर मराठी असं म्हणतात. दक्षिणी मराठी असंही या भाषेला म्हटलं जातं. 

6/7

तामिळ भाषा आणि संस्कृतीचा मराठी लोकांवर व त्यांच्या जीवनपद्धतीवर परिणाम होऊ लागला आणि नवीन भाषा उदयास आली. 

7/7

 आजही तंजावरमध्ये मराठी कुटुंब आहेत जे दक्षिणेकडील पंरपरा व भाषा जपत आहे. आजही काही ठिकाणी तंजावर मराठी बोलली जाते. तंजावरमध्ये आजही भोसले घराण्याचे वंशज राहतात. पॅलेस कॉम्प्लेक्स या राजवाड्यात भोसले घराण्याचे वंशज राहतात. येथील राजवाड्यात मराठी सत्तेच्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा दिसतात.